आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifa World Cup 2014 Players Ronaldo Messi Klose News In Marathi

फिफा वर्ल्डकप आजपासून, ब्राझील विरुद्ध क्रोएशिया यांच्यात पहिला सामना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुटबॉलचा महासंग्राम फिफा विश्वचषकाला आज पासून सुरवात होत आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 1.30 वाजता ब्राझील विरुद्ध क्रोएशिया यांच्यातील लढतीने या स्पर्धेचा प्रारंभ होईल.
ब्राझील दुसर्‍यांदा यजमान झाला. यापूर्वी 1950 मध्ये आयोजन केले होते. तेव्हा फायनलमध्ये उरुग्वेने हरवले होते.
क्रोएशिया
स्टार खेळाडू - निकिका जेलाविच हा क्रोएशियाचा एकमेव स्ट्रायकर असेल. डावपेचही त्याच्याभोवती केंद्रित असतील. जोसिफ सिमोनिच, डॅनियल फ्रांझिक व गार्डन शील्डेन आदी खेळाडूंच्या गैरहजेरीत संघाला स्टार खेळाडूंची कमतरता भासेल.
ब्राझील
स्टार खेळाडू - नेमार हा ब्राझीलचा 22 वर्षीय स्टार खेळाडू सेंटर फॉरवर्ड फ्रेडसोबत प्रतिस्पर्ध्याची बचाव फळी भेदू शकतो. बचाव फळीत तिएगो सिल्व्हा, लुईस, मिडफील्डमध्ये पोल्हिन्हो गुस्तावो असतील.

आमने-सामने
उभय संघांनी एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळले आहेत. 2006 वर्ल्डकपमध्ये ब्राझील जिंकला. 2005 मध्ये दुसरा सामना ड्रॉ ठरला.
साओ पावलोत पहिला सामना
हे ब्राझीलचे सर्वात मोठे शहर आहे. अरेना कोरिन्थियान्स स्टेडियममध्ये शुभारंभासह सहा सामने होतील. या शहराने ब्राझीलला पॉल्हिन्हो, कापू, लुकास मोरा, ऑस्करसारखे स्टार खेळाडू दिले आहेत.

फायनल
रियो द जानेरोमध्ये 13 जुलै रोजी होणार.
207 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार विश्वविजेत्या संघाला
ब्राझील
5 विश्वविजेतेपदे
0गेल्या 16 पैकी 15 सामन्यांत विजय मिळवला आहे.

क्रोएशिया
चौथ्यांदा विश्वचषकात खेळणार. साखळी फेरीतून विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश करण्याचे क्रोएशियाचे पहिले उद्दिष्ट असेल.