आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिफा वर्ल्डकप : संगीताच्या सान्निध्यात शानदार प्रदर्शन करणार रुनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान आपली आवडती गाणी ऐकता यावीत यासाठी इंग्लंडचा स्ट्रायकर वायने रुनीने गाण्यांची यादी तयार केली आहे. सराव सामने, प्रत्यक्ष सामने तसेच विजयानंतर नेमकी कोणती गाणी ऐकणार हे त्याने आधीच निश्चित करून ठेवले आहे. त्याला लोकप्रिय गायक सॅम स्मिथ आणि जेम्स ब्रांट यांची गाणी ऐकायला आवडतात. याची माहिती त्याने ट्विटरवरसुद्धा दिलेली आहे.
रोनाल्डोची साप्ताहिक कमाई 3 कोटी
लिस्बन - पोतरुगालचा फुटबॉल सुपरस्टार क्रिस्टियाने रोनाल्डो याची आठवड्याची कमाई ऐकली तर आपली बोटे तोंडात गेल्याशिवाय राहणार नाहीत. रिअल माद्रिद फुटबॉल क्लबकडून खेळताना आठवड्याला 3 कोटींची कमाई करतो. मी कधीच बँक बॅलन्स बघत नाही, असे रोनाल्डोने माध्यमांशी बोलताना सांगितले. पूर्वी रोनाल्डो खूप गरीब होता. ख्रिसमससाठीची भेटवस्तू घेण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नसायचे. त्याने फुटबॉलमधून अमाप कमाई केली आहे. मात्र, याचा त्याला काहीच गर्व नाही.

मरकाना स्टेडियमचे बांधकाम अपूर्णच
रिओ दी जानेरिओ - विश्वचषक फुटबॉल स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, सुमारे 80 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या मरकाना स्टेडियममधील बरेचसे बांधकाम अद्यापही अपूर्णच आहे. या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता आधी जास्त होती. ती कमी करण्यात आली आहे. मरकानात 13 जुलैला होणार्‍या फायनलसहित एकूण 7 सामने खेळवले जाणार आहेत. ब्राझीलच्या वरिष्ठ खेळाडूंनी या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे.

तापमान घटल्याने सराव थांबवला
रिओ दी जानेरिओ - ब्राझीलच्या संघाचा आतापर्यंत जोरदार सराव सुरू होता. मात्र, गुरुवारी अचानक तापमान घटून 14 अंश सेल्सियसवर पोहोचल्याने त्यांच्या सरावावर परिणाम झाला. त्यामुळे नेमार आणि ऑस्करसारख्या खेळाडूंनी सरावाऐवजी विर्शांतीलाच अधिक पसंती दिली. एक दिवस सराव थांबवल्याने काही फरक पडणार नाही, असे ब्राझील संघाचे प्रशिक्षण स्कॉलरी यांनी म्हटले आहे.