आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • FIFA World Cup News In Marathi, France Win In Trail Match

विश्वचषक फुटबॉल स्पर्धा: सराव सामन्यात फ्रान्सचा विक्रमी विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिओ दि जानेरिओ- फ्रान्स टीमने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या तयारीसाठी सुरू असलेल्या सराव सामन्यात जमैकाचा धुव्वा उडवला. या टीमने सामन्यात 8-0 ने एकतर्फी विजयाची नोंद केली. करीम बेन्झेमाने (37, 63 मि.), ग्रिइझेमान (77, 89 मि.)आणि गिराऊड (53 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर फ्रान्सने सामना जिंकला. संघाच्या विजयात कॉबेस (17 मि.), माटुइडी (20,6 मि.मि.) यांनीही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या धडाकेबाज विजयासह फ्रान्सने विश्वचषकातील आपल्या मोहिमेला चांगली सुरुवात करण्याचे संकेत दिले.

फ्रान्सने सराव सामन्यात दमदार सुरुवात करताना अवघ्या 17 मिनिटांमध्ये 1-0 ने आघाडी घेतली. काबेसने फ्रान्सकडून सामन्यात गोलचे खाते उघडले. त्यापाठोपाठ माटुइडीने अवघ्या तीन मिनिटांमध्ये टीमच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्यानंतर करीम बेन्झेमाने वैयक्तिक पहिला आणि फ्रान्सकडून तिसरा गोल नोंदवला. या गोलच्या बळावर फ्रान्सने मध्यंतरापूर्वीच लढतीत 3-0 ने आघाडी घेतली. दरम्यान, जमैकाच्या खेळाडूंनी गोलचे खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना अपेक्षित यश मिळवता आले नाही.

ग्रिइझेमानचा डबल धमाका
दुसर्‍या हाफमध्ये ग्रिइझेमान, बेन्झेमा आणि माटुइडीने गोलचा धमाका उडवला. मध्यंतरानंतर गिराऊडने 53 व्या मिनिटाला फ्रान्सकडून गोल केला. त्यापाठोपाठ 63 व्या मिनिटाला बेन्झेमा आणि 66 व्या मिनिटाला माटुइडीने गोल केले. यासह फ्रान्सने सामन्यातील आपली पकड अधिकच घट्ट केली. त्यानंतर ग्रिइझेमानने 77 आणि 89 व्या मिनिटाला दोन गोल करून फ्रान्सचा सामन्यातील एकतर्फी विजय निश्चित केला.

इटलीच्या शानदार विजयात इमोबाइलची हॅट्ट्रिक
माजी चॅम्पियन इटलीने सराव सामन्यात ब्राझीलच्या क्लब लॅमिनेंसचा 5-3 ने पराभव केला. या विजयात इमोबाइलने गोलची हॅट्ट्रिक करून मोलाचे योगदान दिले. तसेच लोरेंजो इनसिग्नेने दोन गोल करून संघाचा विजय निश्चित केला. इटलीचा पहिला सामना शनिवारी मानौसच्या मैदानावर माजी चॅम्पियन इंग्लंडशी होणार आहे.

फ्रान्सने 19 वर्षांनंतर मिळवला मोठा विजय
तब्बल 19 वर्षांनंतर माजी चॅम्पियन फ्रान्सने मोठ्या विजयाची नोंद केली. फ्रान्सने सराव सामन्यात जमैकाचा 8-0 ने पराभव केला. फ्रान्सने 1995 मध्ये युरो चषकाच्या पात्रता सामन्यात अझरबैजानला 10-0 ने हरवले.

सराव लढतीत अल्बिनाची सॅन मारिनोवर 3-0 ने मात
अल्बिना टीमने सराव सामन्यात सॅन मारिनोचा 3-0 ने पराभव केला. मावराज (27 मि.), वाजुशी (32 मि.) आणि विला (73 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून अल्बिनाला एकतर्फी विजय मिळवून दिला. मध्यंतरापूर्वीच अल्बिनाने मजबूत आघाडी घेतली होती.

असे झाले गोल
17 वा मिनिट, पहिला गोल (काबेस)
20 वा मिनिट, दुसरा गोल (माटुइडी)
37 वा मिनिट, तिसरा गोल (बेन्झेमा)
53 वा मिनिट, चौथा गोल (गिराऊड)
63 वा मिनिट, पाचवा गोल (बेन्झेमा)
66 वा मिनिट, सहावा गोल (माटुइडी)
77 वा मिनिट, सातवा गोल (ग्रिइझेमान)
89 वा मिनिट, आठवा गोल (ग्रिइझेमान)