आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण अमेरिका टीम विश्वविजेता होण्यास सज्ज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दक्षिण अमेरिकेतील देश उरुग्वेला कधीतरी विश्वचषकाचा दावेदार मानले गेले आहे. खासकरून या टीमला शेजारी देश ब्राझील आणि अर्जेंटिनासारखी कधीही मोठी संधी मिळाली नाही. तरीही या संघाने दोन वर्ल्डकप जिंकले आहेत. मागील वर्ल्डकप तर या टीमने ब्राझीलमध्येच 1950 ला जिंकला होता.

यंंदाच्या वर्ल्डकपमध्ये प्रशिक्षक आॅस्कर वॉशिंग्टन तबरेजच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या या टीमला कमी लेखून चालणार नाही. तबरेजच्या मार्गदर्शनाखाली या संघाने कोपा अमेरिका चषकही जिंकला आहे. तसेच 2010 च्या वर्ल्डकपची उपांत्य फेरीही गाठली होती. हा संघ ड गटातून खेळणार आहे. याच गटात इटली, इंग्लंड आणि कोस्टारिकाचाही समावेश आहे. त्यामुळे याच गटात रोमांचक सामने रंगतील.

तबरेज हे आपल्या टीमला 4-4-3 अशा डावपेचासह मैदानावर उतरवतात. ही रणनीती काउंटर अटॅकसाठी अधिक प्रभावी ठरते. तसेच कोच तबरेज हे प्रतिस्पर्धी टीमनुसार मैदानावरील डावपेच बदलत राहतात. यामध्ये ते फार निष्णात आहेत. त्यांचे हेच यशस्वी डावपेच आता ब्राझीलमध्ये पाहावयास मिळवतील.

आक्रमण मजबूत बाजू
उरुग्वे टीमकडे लुईस सुआरेझ आणि एडिनसन कवानी हे दोन दिग्गज स्ट्रायकर आहेत. प्रतिस्पर्धी टीमसाठी हे दोघेही अधिकच धोकादायक ठरतात. ऐन फॉर्मात येताच हे दोघेही संघाकडून उल्लेखनीय कामगिरी करण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत.

वयस्कर खेळाडू
कर्णधार आणि सेंटर बॅक डिएगो लुगानो, मिडफील्डर एनिडियोसह टीममधील अनेक खेळाडूंचे वय हे 30 पेक्षा अधिक आहे. त्यामुळेच संघाचा खेळ संथ झाला आहे. याचा फायदा प्रतिस्पर्धी टीमला होतो.
सुआरेझ स्टार खेळाडू
संघातील 26 वर्षीय लुईस सुआरेझला सुपरस्टार खेळाडू मानले जाते. मात्र, सध्या गंभीर दुखापतीमुळे त्याचे यंदाच्या वर्ल्डकपमध्ये खेळणे अद्याप निश्चित नाही. मात्र, खेळल्यास तो कोच तबरेज यांचे डावपेच यशस्वी करण्याची संधी सोडणार नाही. लिव्हरपूलकडूून खेळणारा सुआरेझ हा वेगवान आणि चेंडूवर ताबा मिळवण्यात अधिक तरबेज आहे. तो उरुग्वे टीमचा मॅच विनर मानला जातो.