आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fifa World Cup Opening Ceremony Singer Shakira Singing La La La

FIFA World Cup: ब्राझीलमध्ये यंदा शकिराचे ला ला ला; काउंटडाऊन सुरु

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रासिलिया- कोलंबियाची प्रसिद्ध पॉप स्टार शकिराने ‘वाका वाका’ या गाण्याच्या माध्यमातून 2010 च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत धमाल उडवून दिली होती. आता ही पॉप स्टार पुन्हा एकदा नव्या गाण्यांसह फुटबॉल चाहत्यांसमोर येणार आहे. ला ला ला या गीताद्वारे ती आता आपल्या लाखो चाहत्यांना भुरळ घालणार आहे. याल ब्राझीलमधील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे निमित्त आहे.

यासाठी तिने गुरुवारी आपले ला ला ला हे गाणे रिलीज केले आहे. यंदाही हे गाणे चाहत्यांमध्ये सुपरहिट ठरेल, असा तिला विश्वास आहे. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये 37 वर्षीय शकिरासोबत स्टार लियोनेल मेसी, सेस्क फेब्रेगासएरिक, अबिदाल, नेमार, जेम्स रोड्रिग्जसारखे दिग्गज खेळाडूही आहेत.

16 महिन्यांच्या चिमुकल्याची किक
या गाण्याच्या व्हिडिओमध्ये शकिराच्या मित्राचा 16 महिन्यांचा चिमुकलाही दिसत आहे. तो यामध्ये फुटबॉलला किक मारताना दाखवण्यात आला आहे.

पुढील स्लाइड्‍स वाचा, स्पेनला पराभवाची परतफेड : स्नेडर