आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोहली- गंभीरचे वर्तन धक्कादायक - गावसकर, श्रीसंतही भडकला!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरू- आपल्या तापट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंर्जसचा कर्णधार विराट कोहली यांच्यात गुरुवारी आयपीएल सामन्यात वाद रंगला. दरम्यान, या दोघांच्या वर्तनाबाबत आता टीका होऊ लागली आहे. सुनील गावसकर यांनी ही बाब धक्कादायक व दुखद असल्याचे म्हटले आहे.

गावसकर म्हणाले, खेळ म्हटले की हार-जीत आली. तसेच जिंकण्यासाठी संघर्षही आला. आयपीएलसारख्या स्पर्धेमध्ये प्रत्येक विजय महत्त्वाचा ठरतो त्यामुळे विजयासाठी चुरस आलीच. पण म्हणून मैदानावर दोन खेळाडूंमध्ये अश्‍लिल शब्दांचा वापर, शिव्या देणे, भांडण करणे योग्य नाही. दिल्लीच्या रणजी संघात एकत्र खेळणारे खेळाडू सहका-यालाच जर शिवीगाळ करीत बाचाबाची करतात, हे खूपच दुखद आहे अशी प्रतिक्रिया माजी क्रिकेटपटू समालोचक सुनील गावसकर यांनी दिली आहे.
ही घटना बंगळुरू संघाच्या डावात दहाव्या षटकादरम्यान घडली. लक्ष्मीपती बालाजीच्या चेंडूवर विराट कोहलीने स्वीपर कवरवर इयान मोर्गनच्या हाती झेल दिला. विराटने 35 धावा काढल्या. या वेळी बंगळुरूचा स्कोअर 75 होता. कोहली बाद झाल्यानंतर कोण काय बोलले, हे सांगणे कठीण आहे. मात्र, ही विकेट पडल्यानंतर जल्लोष करणारा गंभीर वेगाने चालत विराटच्या दिशेने आला.
बंगळुरूचा कर्णधार आपल्या जागी उभा राहून काही तरी पुटपुटत होता. दिल्लीच्या या दोन खेळाडूंमध्ये वादाची चिन्हे दिसत होती. मात्र, दिल्लीच्याच रजत भाटियाने मध्यस्थी करून परिस्थितीवर ताबा मिळवला. दोघांनाही एकमेकांपासून दूर नेले. भाटियाने विराटला बाजूला नेले. त्यानंतर बंगळुरूचा कॅप्टन पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, मैदानावर घडलेल्या अनुचित प्रकाराचे दृश्य जगभर पाहिले गेले.
पुढे वाचा, श्रीसंत- भज्जीच्या वादाबाबत....