आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाला मालिकेच्या फायनलमधील प्रवेशाची संधी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी- तिरंगी मालिकेत साेमवारी भारत अाणि अाॅस्ट्रेलिया यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे अाता टीम इंडियाचा मालिकेच्या अंतिम फेरीतील प्रवेशाचा मार्ग साेपा झाला अाहे. भारतीय संघाला अाता मालिकेतील केवळ एक सामना जिंकून फायनलमध्ये प्रवेश करता येईल. शुक्रवारी भारताचा सामना इंग्लंडशी हाेईल. या सामन्यातील विजेत्या संघाला फायनलचे तिकीट मिळणार अाहे.
येत्या 1 फेब्रुवारी मालिकेतील अंतिम सामना रंगणार अाहे. सलगच्या तीन विजयांसह अाॅस्ट्रेलियाने फायनलमध्ये धडक मारली. इंग्लंड व भारत या दाेन्ही संघांत अंतिम फेरीतील प्रवेशासाठी झंुज रंगणार अाहे. भारताचे तीन सामन्यांत दाेन व इंग्लंडचे ५ गुण झाले अाहेत. अाॅस्ट्रेलिया १५ गुणांच्या बळावर अव्वल स्थानावर अाहे. भारताला अद्याप विजयाचे खाते उघडता अाले नाही. दाेन्ही सामन्यांत भारताला पराभवाला सामाेरे जावे लागले. साेमवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला उशिरा सुरुवात झाली. त्यामुळे हा सामना प्रत्येकी ४४ षटकांचा ठेवण्यात अाला. या वेळी भारताने दाेन बाद ६९ धावा काढल्या हाेत्या. पुन्हा पावसाचे अागमन झाले. पावसामुळे हा सामना रद्द झाला.

संक्षिप्त धावफलक :
भारत : २ बाद ६९ धावा (अजिंक्य रहाणे २८*, शिखर धवन ८, अंबाती रायडू २३, काेहली ३*, १/११ स्टार्क, १/२१ मार्श )