आबुधाबी - तीन सीनियर क्रिकेटपटूंच्या दमदार प्रदर्शनामुळे पाक संघाने सोमवारी इतिहास घडवला. ४० वर्षीय मिसबाह-उल-हक, ३६ वर्षांचा युनिस खान आणि ३५ वर्षीय फिरकीपटू झुल्फिकार बाबर यांचे दमदार प्रदर्शन आणि युवा अझहर अलीच्या दोन्ही डावांतील शतकाच्या बळावर पाकिस्तानने दुस-या आणि मालिकेतील अखेरच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला सहज हरवले. पाकने तब्बल ३५६ धावांनी विजय मिळवत ही मालिका २-० ने जिंकली. मागच्या २० वर्षांत प्रथमच पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
पाकसाठी दुस-या डावात डावखुरा फिरकीपटू झुल्फिकार बाबरने ५ गडी बाद केले. पाकिस्तानने
आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियासमोर ६०३ धावांचे डोंगराइतके मोठे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ८८.३ षटकांत २४६ धावा काढून गुडघे टेकले.
स्मिथचे शतक हुकले
ऑस्ट्रेलियाच्या दुस-या डावात स्टिव्हन स्मिथने साहसी खेळ करताना सर्वाधिक ९७ धावा काढल्या. त्याचे शतक अवघ्या ३ धावांनी हुकले. स्मिथने २०४ चेंडूंचा सामना करताना १२ चौकारांसह ही खेळी केली. शतकाच्या जवळ आला असताना त्याला यासिर शाहने पायचित केले. त्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या २३८ धावा झाल्या होत्या. स्मिथ सहाव्या विकेटच्या रूपाने बाद झाला. स्मिथ पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर कांगारूंचा डाव लवकर आटोपला. त्यांनी नंतर अधिक वेळ झुंज दिली नाही. स्मिथशिवाय मिशेल मार्शने ४७ आणि सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने ५८ धावांचे योगदान दिले. वॉर्नरने ७५ चेंडूंचा सामना करताना ६ चौकार मारले. हफिजने त्याला टिपले.
मिसबाह, युनिस मालिकेत चमकले
दुस-या कसोटीच्या दुस-या डावात अवघ्या ५७ चेंडूंत शतक ठोकून पाकच्या मिसबाह-उल-हकने विंडीजच्या व्हिव्हियन रिचर्ड््स यांच्या विक्रमाची बरोबरी केली. मिसबाहने दोन्ही डावांत शतके ठोकली. त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. दुसरीकडे पाकचा अनुभवी फलंदाज युनिस खानने आपल्या दमदार फलंदाजीच्या बळावर मालिका गाजवली. त्याने दोन कसोटींत तब्बल ४६८ धावा ठोकल्या. या शानदार प्रदर्शनामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला.
ऑस्ट्रेलियाची हाराकिरी
भारतीय उपखंडात सलग सहावी कसोटी गमावण्याची वेळ ऑस्ट्रेलियावर आली. ऑस्ट्रेलियाने या मालिकेपूर्वी मागच्या वर्षी भारत दौ-यात ४-० ने मालिका गमावली होती. फिरकीपटूंना साथ देणा-या खेळपट्यांवर कांगारूंची पंचाईत होते, हे गेल्या सहा कसोटींत सिद्ध झाले आहे. या वेळी पाकच्या कमी अनुभवी फिरकीपटूंनी कांगारूंना सळो की पळो करून सोडले. पाकचा नियमित अनुभवी फिरकीपटू सईद अजमल या वेळी संघात नव्हता. तो पाक संघात असता तर ऑस्ट्रेलियाची याहून अधिक वाईट अवस्था झाली असती. कांगारूंच्या ७ फलंदाजांना दोन अंकी धावासुद्धा काढता आल्या नाहीत.
धावफलक
पािकस्तान पहिला डाव ६/५७०. ऑस्ट्रेलिया पहिला डाव २६१. पािकस्तान दुसरा डाव ३ बाद २९३.
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव धावा चेंडू ४ ६
रॉजर्स झे. शफिक गो. झुल्फिकार ०२ २७ ० ०
वॉर्नर झे. यासिर गो. हफिज ५८ ७५ ६ ०
मॅक्सवेल पायचित गो. झुल्फिकार ०४ १२ ० ०
क्लार्क ित्र.गो. झुल्फिकार ०५ १० ० ०
िस्मथ पायचित गो. यासिर ९७ २०४ १२ ०
मार्श झे. शफिक गो. हफिज ४७ १३० ६ ०
हॅिडन ित्र. गो. झुल्फिकार १३ ३८ १ ०
जॉन्सन ित्र.गो. यासिर ०० ०५ ० ०
पीटर सिडल नाबाद ०४ ११ ० ०
स्टार्क ित्र.गो. यासिर ०२ २१ ० ०
लॉयन झे. अझहर गो. झुल्फिकार ०० ०१ ० ०
अवांतर: १४. एकूण : ८८.३ षटकांत सर्वबाद २४६ धावा. गोलंदाजी : रहात अली ८-६-३-०, इम्रान खान ८-१-२९-०, मो. हफिज १७-४-३८-२, झुल्फिकार बाबर ३२.३-२-१२०-५, यासिर शाह २२-४-४४-३, अझहर अली १-०-१-०.
सामनावीर : मिसबाह. मािलकावीर : युनिस खान.