आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेजबाबदारीने कार चालवल्याबद्दल सामीविरुद्ध एफआयआर दाखल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची- बेजबाबदारीने कार चालवल्याबद्दल पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. उमर गुलच्या घरी सैनिकांनी छापा टाकल्यानंतर दुसर्‍या दिवशी पाकिस्तानचा आणखी एक क्रिकेटपटू चर्चेत आला आहे. श्रीलंका दौर्‍यावर गेलेल्या पाक संघात गुल आणि सामीचा समावेश आहे. गुलबर्ग पोलिस ठाण्यात फारुख इलियास चीमा या वकिलाने सामीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. बेजबाबदारीने गाडी चालवून सामीने आपल्या कारला जोरदार ठोस मारली. यात आपले बरेच नुकसान झाले आहे, असे चीमा यांनी तक्रारीत म्हटले. अपघाताच्या वेळी सामीने मला नुकसानभरपाई देण्याचे कबुल केले होते. मात्र, नंतर वारंवार स्मरण करून दिल्यानंतरही त्याने टाळाटाळ केली, अशी तक्रारही त्यांनी केली.