(कुलदीप यादव- फाइल फोटो)
आतापर्यंत एकही रणजी ट्रॉफी न खेळलेला कानपुर (उत्तर प्रदेश) चा कुलदीप यादव
टीम इंडिया मध्ये
आपला जलवा दाखवायला तयार झाला आहे. 19 वर्षीय कुलदीपने आयपीएल आणि अंडर-19 विश्व चषकामध्ये केलेल्या कामगिरीच्या आधारावर निवड समितीने वेस्ट इंडीजच्या अनुभवी संघाविरुध्द त्याला भारतीय संघात सामिल करुन घेतले आहे.
क्रिकेटमध्ये बदलत चाललेला स्पिन बॉलिंगमधील ट्रेंड आणि फलंदाजांना चकित करण्यासाठी निवड समितीने चाइनामॅन गोंलदाजाला मैदानात उतरविले आहे. क्रिकेट चगतामध्ये अशा शैलीचे गोलंदाज फार कमी असतात.
यावषी झालेल्या अंडर-19 विश्व चषकामध्यग कुलदीपने चोख भूमिका बजावली. त्याने 16.42 च्या सरासरीने 14 विकेट मिळविल्या. त्याचा बेस्ट परफॉरमंन्स 10 धावा देत 4 विकेट आहे. टी-20 मध्ये त्याने 12.64 च्या सरासरीने 14 विकेट मिळविल्या आहेत. मुश्ताक अली चषकामध्ये त्याची उल्लेखनिय कामगिरी राहिली आहे.
काय आहे चाइनामॅन गोलंदाजी?
कुलदीप चाइनामॅन बॉलिंगसाठी प्रसिध्दध आहे. यामध्येर लेफ्ट आर्म स्पिनर गोलंदाज चेंडुला असे स्पिन करतो जणूकाही सरळ हाताने तो गोलंदाजी करणारा ऑफ स्पिनर आहे. हात आणि मनगटाची एक वेगळीच अॅक्शन त्यामध्ये असते. त्यामुळे त्याचे बॉल फलंदाजाला कळत नाहीत. खेळायला अवघड जातात.
‘चायनामॅन गोलंदाज’ हा शब्द क्रिकेट इतिहासत 1933 पासुन आला. वेस्ट इंडीजचा फिरकीपटू एलिस अचॉन्ग डाव्या हाताने गोलंदाजी करताना ऑफ स्पिन करत होता. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये झालेल्या सामन्याशमध्ये त्याच्या या अनोख्या शैलीमध्ये त्याने इंग्लंडच्या वॉल्टर रॉबिन्सला क्लीन बोल्ड केले होते. या चेंडूवर आऊट झाल्यायने रॉबिन्सने पव्हेयलियनमध्ये परताना अंपायरला म्हटले की, 'मला या चाइनामॅनने आउट केले आहे'. तेव्हापासून हा शब्द क्रिकेटमध्ये रुढ झाला.
उल्लेखनिय म्हणजे, अचॉन्ग मूळ चीनचा राहणारा होता. तेव्हापासून लेफ्ट ऑर्म अनऑर्थोडॉक्स गोलंदाजी करणा-या गोलंदाजांना 'चाइनामॅन' असे नाव पडले.
पहिला भारतीय 'चाइनामॅन'
भारतीय क्रिकेटच्याा इतिहासात वीनू मांकड़, बिशन सिंह बेजी आणि रवींद्र जडेजा सारखे खब्बू स्पिनर झाले परंतू चाइनामॅन कॅटेगिरीमध्येड कुलदीप एकमेव भारतीय आहे. ज्या वेस्ट इंडीज च्या गोलंदाजामुळे 'चाइनामॅन बॉलिंग' चर्चेत आली त्या़च संघाविरुध्दं भारत आपला चायनामॅन खेळवणार आहे.
पुढील स्लाइइडवर पाहा, जगभरातील ‘चायनामॅन’ गोलंदाज आणि त्याची कामगिरी ...