आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • First Day Of Retirment Of Sachin Tendulkar: Something Will Do For Cricket In Country

निवृत्तीनंतर सचिन तेंडुलकरचा पहिला दिवस: देशात क्रिकेटसाठीच काही तरी करणार...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - यानंतर काय करणार हे ठरवायचे आहे. निवृत्त होऊन आताशी 24 तास उलटले आहेत. हे खरे की क्रिकेटपासून मी दूर जाऊ शकत नाही. भविष्यात यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेईन. 24 वर्षांचा स्वप्नवत प्रवास शनिवारी थांबला. ज्या क्षणी वाटले की हा प्रवास झेपणार नाही, त्याच क्षणी मी थांबण्याचा निर्णय घेतला. क्रिकेट हेच माझे जीवन, प्राणवायू होता...निवृत्तीनंतर 24 तासांनी सावरलेल्या सचिनने या शब्दांत पत्रकारांसमोर मन मोकळे केले.
सकाळचा चहा स्वत:च केला
सकाळी नेहमीप्रमाणे सव्वासहाला जाग आली. तेव्हा सर्वप्रथम लक्षात आले, आजपासून क्रिकेट नाही. शरीराला सवय झाली आहे. सकाळी उठून स्वत: चहा केला. पत्नी अंजली उठल्यानंतर सकाळची न्याहारी एकत्र केली. चाहत्यांचे मेसेज वाचले. त्यांना उत्तरे पाठविली. क्रिकेट आज नाही, यापुढे नाही या कल्पनेने निश्चिंत झालो.
भारतरत्न सर्व मातांना अर्पण
भारतरत्न मिळावा अशी इच्छा व्यक्त करणा-यांचे सचिनने आभार मानले. तो म्हणाला, मी हा बहुमान आईला अर्पण करत असल्याचे म्हटले होते. भावना ही की, मातेने माझ्यासाठी खूप त्याग केला. आई-वडील मुलांसाठी त्यागच करतात. यातील सौंदर्य हे की, पालक पाल्याला त्यागाबद्दल कधीही सांगत नाहीत. म्हणूनच आज भारतातील अशा सर्वच मातांना मी ‘भारतरत्न’ अर्पण करतो.
त्या भूमीचे आभार मानायचे होते
सचिनने खेळपट्टीला प्रणाम करून क्रिकेटला अलविदा केला. त्याबाबत सविस्तरपणे सांगताना तो म्हणाला, ‘आज मी जो काही आहे तो या 22 यार्डाच्या भूमीमुळे. 22 यार्डाची खेळपट्टी म्हणजे माझ्यासाठी देऊळच. त्या भूमीचे मला आभार मानायचे होते म्हणून मी नमस्कार केला. मला अत्युच्च शिखरावर नेणारी खेळपट्टी आणि क्रिकेटचे मनापासून आभार...
एवढा भावुक मी कधी झालो नव्हतो...
मी त्याआधी कधीही भावुक झालो नव्हतो. निवृत्तीचा विचार करतानाही नाही. मात्र जेव्हा मला खेळाडूंनी निरोप दिला तेव्हा यापुढे प्रेक्षकांसमोर असे खेळता येणार नाही, याची प्रथम जाणीव झाली आणि मी हळवा झालो. त्यानंतर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. विंडीज खेळाडू माझ्याशी हस्तांदोलन करीत होते, तेव्हा मी चेहरा लपवूनच हस्तांदोलन करीत होतो. त्यानंतर पुन्हा खेळपट्टीवर आलो. तेव्हा खेळपट्टीला नमस्कार केला. मी त्या वेळी खेळपट्टीशी बोलत होतो. त्या वेळी पुन्हा एकदा मला गहिवरून आले. त्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये अश्रूंना वाट करून दिली.
तिघांची पार्टनरशिप...
* आचरेकर सरांच्या आशीर्वादाने येथवर पोहोचलो. इतरही अनेक जण होते, ज्यांचा माझ्या यशाला हातभार लागला. घरी भाऊ अजित आणि मैदानावर आचरेकर सर अशी आमची तिघांची ‘टीम’ होती. गेली 30 वर्षे आम्ही तिघांनी एकत्रपणे एकच स्वप्न पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. आमच्या तिघांची ती ‘पार्टनरशिप’ शब्दात मांडता यायची नाही.
* कारकीर्दीतला दुखापतींचा कालखंड अतिशय कठीण होता. प्रत्येक दुखापतीनंतर वाटायचे की पुन्हा येणे कठीण आहे. प्रत्येक वेळी दुखापतींमधून बरे होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी दिला जायचा. तो काळ कमी करता येत नव्हता. त्यामुळे निसर्गाची मदतदेखील महत्त्वाची होती. टेनिस एल्बोच्या दुखापतीनंतर तर माझी क्रिकेट कारकीर्दच संपली आहे असे वाटले होते. ती दुखापत बरी होण्यासाठी तब्बल साडेचार महिने लागले. माझ्या मुलाची फ्लास्टिकची बॅटही उचलणे मला त्या वेळी जड जात होते. दुखापतीतून बरे झाल्यानंतर जेव्हा नेट्समध्ये सराव करायला गेलो तेव्हा जोराने मारलेला चेंडू जेमतेम 10 यार्डावरच मुले अडवत होती. त्या वेळी माझ्यावर प्रचंड दडपण आले होते. तो कठीण कालखंड होता.
*अजित आणि मी दोघांनी एकच स्वप्न पाहिले आणि ते आम्ही जगलो. मी अजितला आणि देशाला असे दोघांचे एकाच वेळी प्रतिनिधित्व करीत होतो. अजितने माझ्यासाठी केलेले शब्दात मांडणे कठीण आहे. येथेही तो भावनाविवश झाला होता पण तो ते दाखवत नव्हता.
* माझ्या कारकीर्दीतील मला आवडणा-या दोन खेळी आहेत. माझे इंग्लंडविरुद्धचे ओल्ड ट्रॅफर्डवरचे पहिले कसोटी शतक आणि इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत 2008 मध्ये 374 धावांचा पाठलाग करताना काढलेले शतक.
* भारतरत्न पुरस्काराबाबतच्या वादविवादात न पडता सचिन म्हणाला, ‘सर्व खेळाडूंच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारणार आहे. क्रीडापटूंसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. आता दरवाजा उघडला आहे. भारताची क्रीडासंस्कृती वाढत आहे. भारताच्या विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंचे योगदान कुणीही विसरू शकत नाही.’
* शतकांचे, विक्रमांचे आई-वडील कसे स्वागत करायचे, यावर सचिन म्हणाला, ‘मी 100 केले किंवा 10-20 धावा काढल्या तरीही आई-वडिलांना फरक पडायचा नाही. शालेय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आई देवापुढे मिठाईचा बॉक्स ठेवायची. आपण सर्व जण जसे देवापुढे गोडधोड ठेवतो तसे आई ठेवायची. अगदी माझ्या शेवटच्या कसोटीतही आईने देवापुढे मिठाई ठेवली होती. पालकांची प्रतिक्रिया कामगिरीनुसार नसावी हे मी अनेक वर्षांपासून आई-वडिलांकडून शिकलो. मुलाची प्रत्येक कामगिरी त्यांना लाख मोलाचीच वाटते.’
* मी अखेरच्या कसोटीत आईला कसोटीला नेण्याची गुप्त योजना आखली होता. प्रसिद्धी माध्यमांनी ती बातमी फोडली, त्यामुळे आईला कळले. एमसीएने आईसाठी गरवारे क्लबमध्ये एक रूम राखून ठेवली होती. संपूर्ण दिवस ती बसून सामना पाहू शकेल याची मला खात्री नव्हती. परंतु आईने प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून पूर्ण सामना पाहिला, त्यामुळे मला खूप आनंद झाला.
* अर्जुनकडून माझ्या खेळाप्रमाणे तुम्ही अपेक्षा करू नका. त्याला त्याचे जीवन जगू द्या. खेळाडूंवर दडपण आणू नये, त्यांना मोकळे सोडा. माझे वडील साहित्यिक होते, त्या वेळी मला कुणी सांगितले नव्हते की, तूही पेन का हाती घेत नाहीस. त्यामुळे अर्जुनला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या, सध्यातरी तो क्रिकेटवर अतिशय प्रेम करतो.
* भारतीय की परदेशी प्रशिक्षक हवा असा वाद करण्यापेक्षा मला वाटते, जो प्रशिक्षक खेळाडूला समजून घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करतो तो मोठा प्रशिक्षक होय. खेळाडू व प्रशिक्षकाचे संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. तसेच कोचवर विश्वास असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यानेही खेळाडूंची गुपिते बाहेर उघड करू नयेत या मताचा मी आहे.
तिघांची पार्टनरशिप...
* आचरेकर सरांच्या आशीर्वादाने येथवर पोहोचलो. इतरही अनेक जण होते, ज्यांचा माझ्या यशाला हातभार लागला. घरी भाऊ अजित आणि मैदानावर आचरेकर सर अशी आमची तिघांची ‘टीम’ होती. गेली 30 वर्षे आम्ही तिघांनी एकत्रपणे एकच स्वप्न पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवले. आमच्या तिघांची ती ‘पार्टनरशिप’ शब्दात मांडता यायची नाही.
* कारकीर्दीतला दुखापतींचा कालखंड अतिशय कठीण होता. प्रत्येक दुखापतीनंतर वाटायचे की पुन्हा येणे कठीण आहे. प्रत्येक वेळी दुखापतींमधून बरे होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी दिला जायचा. तो काळ कमी करता येत नव्हता. त्यामुळे निसर्गाची मदतदेखील महत्त्वाची होती. टेनिस एल्बोच्या दुखापतीनंतर तर माझी क्रिकेट कारकीर्दच संपली आहे, असे वाटले होते. ती दुखापत बरी होण्यासाठी तब्बल साडेचार महिने लागले. माझ्या मुलाची फ्लास्टिकची बॅटही उचलणे मला त्या वेळी जड जात होते. दुखापतीतून बरे झाल्यानंतर जेव्हा नेट्समध्ये सराव करायला गेलो तेव्हा जोराने मारलेला चेंडू जेमतेम 10 यार्डावरच मुले अडवत होती. त्या वेळी माझ्यावर प्रचंड दडपण आले होते. तो कठीण कालखंड होता.
० अजित आणि मी दोघांनी एकच स्वप्न पाहिले आणि ते आम्ही जगलो. मी अजितला आणि देशाला असे दोघांचे एकाच वेळी प्रतिनिधित्व करीत होतो. अजितने माझ्यासाठी केलेले शब्दात मांडणे कठीण आहे. येथेही तो भावनाविवश झाला होता पण तो ते दाखवत नव्हता.
० माझ्या कारकीर्दीतील मला आवडणा-या दोन खेळी आहेत. माझे इंग्लंडविरुद्धचे ओल्ड ट्रॅफर्डवरचे पहिले कसोटी शतक आणि इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत 2008 मध्ये 374 धावांचा पाठलाग करताना काढलेले शतक.
०भारतरत्न पुरस्काराबाबतच्या वादविवादात न पडता सचिन म्हणाला, ‘सर्व खेळाडूंच्या वतीने हा पुरस्कार मी स्वीकारणार आहे. क्रीडापटूंसाठी हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली आहे ही चांगली गोष्ट आहे. आता दरवाजा उघडला आहे. भारताची क्रीडासंस्कृती वाढत आहे. भारताच्या विविध खेळांतील दिग्गज खेळाडूंचे योगदान कुणीही विसरू शकत नाही.’
० शतकांचे, विक्रमांचे आई-वडील कसे स्वागत करायचे, यावर सचिन म्हणाला, ‘मी 100 केले किंवा 10-20 धावा काढल्या तरीही आई-वडिलांना फरक पडायचा नाही. शालेय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर आई देवापुढे मिठाईचा बॉक्स ठेवायची. आपण सर्व जण जसे देवापुढे गोडधोड ठेवतो तसे आई ठेवायची. अगदी माझ्या शेवटच्या कसोटीतही आईने देवापुढे मिठाई ठेवली होती. पालकांची प्रतिक्रिया कामगिरीनुसार नसावी हे मी अनेक वर्षांपासून आई-वडिलांकडून शिकलो. मुलाची प्रत्येक कामगिरी त्यांना लाख मोलाचीच वाटते.’
० मी अखेरच्या कसोटीत आईला कसोटीला नेण्याची गुप्त योजना आखली होता. प्रसिद्धी माध्यमांनी ती बातमी फोडली, त्यामुळे आईला कळले. एमसीएने आईसाठी गरवारे क्लबमध्ये एक रूम राखून ठेवली होती. संपूर्ण दिवस ती बसून सामना पाहू शकेल याची मला खात्री नव्हती, परंतु आईने प्रेसिडेंट बॉक्समध्ये बसून पूर्ण सामना पाहिला, त्यामुळे मला खूप आनंद झाला.
० अर्जुनकडून माझ्या खेळाप्रमाणे तुम्ही अपेक्षा करू नका. त्याला त्याचे जीवन जगू द्या. खेळाडूंवर दडपण आणू नये, त्यांना मोकळे सोडा. माझे वडील साहित्यिक होते, त्या वेळी मला कुणी सांगितले नव्हते की, तूही पेन का हाती घेत नाहीस. त्यामुळे अर्जुनला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात काम करू द्या, सध्यातरी तो क्रिकेटवर अतिशय प्रेम करतो.
० भारतीय की परदेशी प्रशिक्षक हवा असा वाद करण्यापेक्षा मला वाटते, जो प्रशिक्षक खेळाडूला समजून घेऊन त्यांच्या समस्यांचे निवारण करतो तो मोठा प्रशिक्षक होय. खेळाडू व प्रशिक्षकाचे संबंध मित्रत्वाचे असायला हवेत. तसेच कोचवर विश्वास असणे हेदेखील महत्त्वाचे आहे. त्यानेही खेळाडूंची गुपिते बाहेर उघड करू नयेत या मताचा मी आहे.
पहिले चोवीस तास गेले अत्यंत खडतर...
आयुष्यातील 40 पैकी जवळजवळ 30 वर्षे मी खेळलो. आयुष्याचा 75 टक्के काळ क्रिकेटवरच जगलो. यापुढेही तसेच जगेन, असे सचिन म्हणाला. 24 वर्षे ज्या क्रिकेटशिवाय अन्य गोष्टीचा विचार सचिन करू शकला नव्हता त्याला निवृत्तीनंतरचे पहिले चोवीस तास मात्र अत्यंत खडतर गेले.
...फोनवर पलीकडून आवाज आला ‘वेल डन’
आचरेकर सरांनी मला कधीही ‘वेल डन’ म्हटले नव्हते. मी सुस्तावून जाईन, असा धोका त्यांना वाटायचा.भारतरत्न मिळाल्याचे सांगण्यासाठी फोन केला. तेव्हा म्हटले, सर, आता मी निवृत्त झालो आहे. सुस्तावल्याचा परिणाम आता होणार नाही. तेव्हा सरांचा पलीकडून आवाज आला ‘वेल डन’!