आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रांचीत पडणार धावांचा पाऊस; प्रथम फलंदाजी करणारा संघ करेल 350 धावा, क्‍युरेटरचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची- रांचीमध्‍ये नव्‍याने बांधलेल्‍या जेएससीए आंतरराष्‍ट्रीय स्‍टेडिअमवर प्रथम फलंदाजी करणारा संघ 350 धावांचा डोंगर उभा करू शकतो, असे क्‍युरेटर वासुदेव यांनी म्‍हटले आहे. आज (शनिवार) इंग्‍लंडविरूद्धच्‍या वनडे मालिकेतील तिसरा सामना येथे होणार आहे.

झारखंड राज्‍य क्रिकेट संघ (जेएससीए)चे क्‍युरेटर वासुदेव म्‍हणाले,' मी चांगली विकेट तयार केली आहे. इथे चेंडू जास्‍त उसळणार ही नाही आणि खालीही राहणार नाही. विकेटवर थोडे गवतदेखील आहे. खेळ सुरू झाल्‍यानंतर काही वेळाने ते वाळेल. त्‍यामुळे मला वाटतं पहिल्‍यांदा फलंदाजी करणारा संघ 350 धावा करू शकेल.