आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत प्रथमच राष्ट्रीय तिरंदाजी शिबिर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साई) पश्चिम विभागीय प्रशिक्षण केंद्रात भारतीय तिरंदाजी संघाच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर 1 ते 28 जुलैदरम्यान होणार असून रिकर्व्ह व कंपाउंड प्रकारात 48 खेळाडू सहभागी होत असल्याची माहिती साईचे सहायक संचालक वीरेंद्र भांडारकर यांनी दिली.
शिबिरात एक विदेशी आणि पाच भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. शिबिरात देशातील दिग्गज तिरंदाजांचा समावेश असून ऑलिम्पिकपटू दीपिका कुमारी, डोला बॅनर्जी, जयंत तालुकदार, राहुल बॅनर्जी तरुणदीप रॉय आणि एल. बोंबायल्या देवी यांच्यासारखे स्टार खेळाडू सहभागी होत आहेत.
औरंगाबाद साईला प्रथमच तिरंदाजीचे वरिष्ठ गट राष्ट्रीय शिबिर घेण्याची संधी मिळाली आहे. येथे खेळाडूंसाठी सर्व सुविधा उपलब्ध असून त्यांच्या राहण्यासाठी नवीन होस्टेल सज्ज आहे. औरंगाबादकरांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. मराठवाड्यातील तिरंदाजांना देशातील उच्च दर्जाचे खेळाडू कशा प्रकारे सराव करतात हे पाहण्याची व त्याकडून मार्गदर्शन घेण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे भांडारकर म्हणाले.

रिक र्व्ह
पुरुष : तरुणदीप रॉय, अंतनू दास, प्रियांक, जयंत तालुकदार, विश्वास, मंगलसिंग चंपिय, टी. स्युरो, अमरदीप केरकेता, कपिल, ए.आर. तिर्की, राहुल बॅनर्जी, गुरुचरण बेसरा.
महिला : रिमील बुरिउली, दीपिका कुमारी, डोला बॅनर्जी, एल. बोंबायल्या देवी, चेकु्रवोलू स्वुरो, लक्ष्मीराणी माझी, सतबीर कौर, रेश्मा बॅनर्जी, सीमा, रिना कुमारी, पुनिया प्रभा, प्रियंका.

कंपाउंड
पुरुष : रजत चौहान, अभिषेक वर्मा, संदीप कुमार, रतनसिंग, एम. गांधी सिंग, रितुल चटर्जी, अरबीनसिंग, के.बी. चेत्री, केवल प्रीतसिंग, सी. श्रीथर, विमलेंद्र पांडे, चुंगडा शेरपा.
महिला : व्ही. ज्योती सुरेखा, मंजुदा सोव, तृष्णा देब, पी. लिली चानू, जहानो हंसदा, नजाली कुमारी, गंगदीप कौर, साकरो बेसरा, नमिता यादव, परविना, जयालक्ष्मी सारीकोंडा, रेणू मुंडा.