आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IPL: लागोपाठ चौथ्यांदा मुंबई इंडियन्सचा पराभव, हरण्यामागची ही आहेत 5 कारणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओपनर ड्वेन स्मिथ (62) आणि ब्रॅंडन मॅक्कुलम (46) यांच्या तुफानी फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सच्या 182 धावांच्या स्कोअरला अगदी सहज पार केले. या विजयासह चेन्नईने सहा विकेट्स राखून विजयी हॅट्रिक पूर्ण केली. मुंबईने 20 ओव्हरमध्ये सात विकेट्सवर 183 धावांचा स्कोअर केला होता. पण स्मिथ, मॅक्कुलम आणि रैनाच्या धुवांधार बॅटिंगच्या बळावर 16.4 ओव्हरमध्येच चेन्नईने हा सामना जिंकला. या पराभवासह मुंबई इंडियन्स लागोपाठ चौथ्यांदा हरली आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवामागची पाच कारणे आम्ही शोधून काढली आहे. ती खालिलप्रमाणे...
१) आशिष नेहरा- मुंबईला सुरवतीलाच धक्के दिले
आशिष नेहराने पार्थिव पटेलला आऊट केले. त्याला खातेही उघडू दिले नाही. त्यानंतर दिग्गज ऑलराऊंडर अॅंडरसनला 4 धावांवर पॅव्हेलिअनमध्ये पाठवले. फॉफ डु प्लेसिसने त्याची कॅच पकडली. रोहित शर्मा याने मुंबई इंडियन्सच्या बॅटिंगची कमान सांभाळली होती. तो आता धोकादायक ठरेल असे वाटू लागले होते. पण त्याचीही विकेट नेहराने घेतली. सिक्स मारच्या प्रयत्नात तो आऊट झाला. तोपर्यंत रोहितने 31 रनांमध्ये 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 50 रन काढले होते. वरील तिघांपैकी कोणताही फलंदाज आणखी काही काळ टिकला असता तर मुंबईचा स्कोअर 200 च्या पुढे गेला असता.
पुढील स्लाईडवर वाचा, मुंबई इंडियन्सच्या पराभवाची आणखी 4 कारणे...