आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिक्सिंगची तक्रार; ‘त्या’ खेळाडूबाबत निर्णय नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राजस्थान रॉयल्सतर्फे खेळणाऱ्या मुंबई रणजी संघातील खेळाडूने त्याला त्याच्या रणजी सहकाऱ्याकडून आयपीएल ‘मॅच फिक्सिंग’ची ऑफर आली होती, अशी तक्रार बीसीसीआयच्या अँटी करप्शन ब्युरोकडे केली होती. त्यासंदर्भातील कोणताही पत्र मुंबई क्रिकेट असोसिएशनला बीसीसीआयकडून अद्याप मिळालेे नाही. त्यामुळे एमसीए स्वत:हून त्या खेळाडूवर कोणतीही कारवाई करण्याचा विचार सध्या करणार नाही, असा निर्णय त्या खेळाडूंच्या पालक संघटनेने घेतला.

राजस्थानतर्फे खेळणाऱ्या मुंबईच्या रणजीपटूने आपल्याला ‘फिक्सिंग’ची ऑफर आपल्या सहकाऱ्याने दिल्याची तक्रार केली होती. या दोन्ही खेळाडूंची नावे गुलदस्त्यातच आहेत. राजस्थानच्या वतीने आपल्या खेळाडूने तशी तक्रार केल्याचे मान्य केले. त्यानंतर बीसीसीआयने पत्रक काढून तशी तक्रार केली असल्याचे जाहीर केले.
बातम्या आणखी आहेत...