आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fixing Up To Six Indian Players, Suspicion On Mahendrasinga Dhoni

फिक्‍सींगमध्‍ये सहा भारतीय खेळाडू,धोनी संशयाच्‍या भोव-यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- आयपीएल सट्टेबाजी प्रकरण आणि स्‍पॉट फिक्सिंग प्रकरणात सहा भारतीय खेळाडू सहभागी असल्‍याची चर्चा सध्‍या जोरात सुरू आहे. या चर्चेमुळे हे खेळाडू कोण आहेत याकडे सर्वांचे लक्ष्‍ा लागले आहे. मुकुल मुद्रल त्रिसदस्‍यीय समीतीने सर्वोच्‍च न्‍यायालयात सादर केलेल्‍या अहवालात सहा भारतीय खेळाडू फिक्सिंगमध्‍ये सहभागी असल्‍याचा ठपका ठेवला आहे. या अहवालामुळे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी संशयाच्या भोव-यात आडकला आहे.
धोनीची चैकशी करा- ललित मोदी
या समितीने दिलेल्या अहवालानंतर आयपीएलचे माजी आयुक्‍त ललित मोदी यांनी धोनीला आपले लक्ष केले आहे. आयपीएलमध्‍ये चेन्‍नई सुपर किंग्‍ज या संघाचा कप्‍तान असणा-या ध्‍वनीने मॅच फिक्सिंगवर पडता टाकण्‍याचे काम केले आहे. या संघाने जिंकलेले सर्व पुरस्‍कार या संघाकडून परत घेण्‍याची मागणी ललित मोदी यांनी केली आहे.
धोनीचा खोटारडेपना समोर अला असून त्‍याची चौकशी करा अशी मागणी मोदी यांनी केली आहे. ते म्‍हणाले की, फिक्‍सींगमध्‍ये गुरूनाथ मयप्‍पन यांचा काही संबंध नाही, अशी खोटी माहिती धोणीने दिली व मयप्‍पनची बाजू घेतली, समितीने दिलेल्‍या अहवालावरूण सट्टेबाजांना महत्‍वाची माहिती मयप्‍पन पुरवत होते हे सत्‍य बाहेर आले आहे.
फिक्सिंगचे सत्‍य-
- 16 मे 2013 ला मॅच फिक्सिंग झाल्‍याचे उघडकीस.
- श्रीसंत, अंकित चव्‍हाण, अजीत चंडीला, मयप्‍पन, विंदू दारासिंग यांना आटक. यांनतर मयप्‍पन व कुंद्रा यांना क्‍लीन चीट.
- ऑगस्‍ट 2013 मध्‍ये बिहार क्रिकेट एसोसिएशनच्‍या आदित्‍य वर्मा यांनी कोर्टामध्‍ये पीआईएल दाखल केले.