नवी दिल्ली - अमेरिकेचा फ्लाॅयड मेयवेदर अाणि िफलीपिन्सच्या मॅनी पॅकिअाअाेमध्ये शनिवारी महामुकाबला हाेणार अाहे. जगात अात्तापर्यंतचा हा सर्वात महागडा सामना मानला जात अाहे यामुळे या सामन्याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या अाहेत.
दाेनही िदग्गज प्रथमच अामने-सामने येत असून, तब्बल सहा वर्षांनंतर दाेघांनाही िभडवण्यात अायाेजकांना यश अाले अाहे. मेयवेदरचे सामने दाखवण्याचे हक्क शाेटाइमकडे अाहेत तर पॅकीअाअाेच्या सामन्यांचे हक्क एचबीअाेकडे असे असले तरी दाेनही कंपन्यांनी सामना दाखवण्यासाठी करार करण्याची तयारी दर्शवली अाहे. या सामन्यात मेयवेदरला सर्वाधीक पैसे िमळण्याची शक्यता अाहे. मेयवेदरला सामन्यातील ६० टक्के तर पॅकीअाअाेला सामन्यातील ४० टक्के रक्कम िदली जाणार अाहे. दाेन िदग्गज समाेरा-समाेर येणार असले तरी दाेघांमध्ये खूप तफावत अाहे. मेयवेदरचे टाेपण नाव मनी अाहे. ताे जगातील सर्वात महागडा अाणि श्रीमंत खेळाडू अाहे. तर दुसरीकडे पॅकीअाअाे परमेश्वरावर विश्वास ठेवणारा छगमगापासून अलिप्त असलेला खेळाडू अाहे.