आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल: बार्सिलोनाला बिलबाओकडून पराभवाचा धक्का

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद - स्टार फुटबॉलपटू लियोनेल मेसी याच्या अनुपस्थितीत खेळणा-या बार्सिलोना संघाला सलग दुस-या सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला. बिलबाओ संघाकडून 1-0 असा पराभव पत्क रावा लागल्याने बार्सिलोनाची गुणतालिकेत दुस-या स्थानावर घसरण झाली आहे.
अजाक्सविरुद्ध काही दिवसांपूर्वीच पराभूत झालेल्या बार्सिलोनाला पुन्हा मेसीच्या अनुपस्थितीचा फटका बसला. बिलबाओ संघाविरुद्ध खेळतानाही बार्सिलोनाच्या फुटबॉलपटूंना सूरच गवसला नाही. त्यात सामना संपायच्या केवळ वीस मिनिटे आधी मर्कल सुसेटाच्या क्रॉसवर आयकर म्युनिअनने गोल करीत बिलबाओसाठी विजयी गोल लगावला. बार्सिलोनाला मात्र संपूर्ण सामन्यात एकदाही गोल करण्याची संधी मिळाली नाही.
पंचांच्या निर्णयावर नाराजी
मेस्सीच्या अनुपस्थितीत बार्सिलोनाच्या आक्रमणाची धुरा सांभाळणा-या नेमारला मागून खेचणा-या अ‍ॅँडर इत्रुस्पे याला पंच ज्युआन मार्टिनेझ मॅन्युएरा यांनी केवळ यलो कार्ड दाखविल्याबद्दल बार्सिलोनाचे प्रशिक्षक गेरार्डो मार्टिनो यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी दोन्ही संघ शून्य गोलवर बरोबरीत असतानाच चुकीचा निर्णय झाल्याचाही परिणाम पुढील खेळावर झाल्याचे त्यांनी नमूद केले. जेव्हा संधी असते आणि ती घेता येत नाही, त्यावेळी असे परिणाम भोगावे लागत असल्याचे मिडफिल्डर सर्जिओ बस्केटस याने नमूद केले. स्पर्धेत
आव्हान टिकवून ठेवण्यासाठी निदान यापुढील लीग सामने तरी गमावू नये, असे मतही त्याने व्यक्त यावेळी व्यक्त केले.