आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल क्लब: बॅलेने केला 870 कोटी रुपयांचा करार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - जगातला सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब स्पेनच्या रियल माद्रिदने टोटेनहॅमच्या विंगर गॅरेथ बॅलेसोबत दहा कोटी युरो म्हणजे जवळपास 870 कोटी रुपयांचा करार केला आहे. हा एक विश्वविक्रम ठरला आहे. बॅलेला प्रत्येक आठवड्याला जवळपास साडेतीन कोटी रुपये मिळतील. यापूर्वी, हा विक्रम पोतरुगालचा जादुई स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डोच्या नावे होता. 2009 मध्ये रियल माद्रिदने त्याला मँचेस्टर युनायटेडकडून 810 कोटी रुपयांत खरेदी केले होते.

बॅलेसोबत हा सहा वर्षांसाठी करार असल्याचे क्लबने म्हटले आहे. वेल्सचा 24 वर्षीय खेळाडू बॅलेची सुरुवातीला नियमित वैद्यकीय चाचणी होईल. यानंतर त्याचा अधिकृतपणे संघात समावेश केला जाईल. बॅलेने या वृत्ताबाबत दुजोरा दिला आहे. ‘टोटेनहॅमला अलविदा म्हणण्याची ही योग्य वेळ आहे, असे मला वाटते. क्लबसोबत माझ्या अनेक संस्मरणीय आठवणी जुळल्या आहेत. मी क्लबला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. प्रत्येक जण आपल्या आवडत्या क्लबकडून खेळण्याचे स्वप्न बघत असतो. माझे स्वप्न आता पूर्ण होत आहे,’ अशी प्रतिक्रिया बॅलेने व्यक्त केली.