आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्फेडरेशन चषक : ब्राझीलच्या किकवर उरुग्वे बाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेलो होरिजोंटे - यजमान ब्राझील संघाने कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. पाऊलिल्होने (86 मि.) केलेल्या गोलच्या बळावर ब्राझीलने उपांत्य लढतीत उरुग्वेचा 2-1 ने पराभव केला. फ्रेडनेही सुरेख गोल करून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

पाहुण्या उरुग्वेने तब्बल 40 व्या मिनिटापर्यंत यजमान संघाला गोलसाठी चांगलेच झुंजवले. अखेर फ्रेडने 41 व्या मिनिटाला यजमानांकडून पहिला गोल करण्यात यश मिळवले. यासह त्याने ब्राझीलला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी अवघ्या सात मिनिटांत उरुग्वेने मोडून काढली. कावानीने 48 व्या मिनिटाला गोल करून संघाला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. त्यानंतर हा सामना 85 व्या मिनिटांपर्यंत बरोबरीत खेळवला गेला. अखेर पाऊलिन्होने सामन्यात चमत्कार केला. त्याने 86 व्या मिनिटाला हेडरने गोल करून यजमान संघाचा 2-1 ने विजय निश्चित केला.

41 मिनिट पहिला गोल (फ्रेड, ब्राझील)
48 मि. दुसरा गोल (कावानी, उरुग्वे)
86 मि.तिसरा गोल (पाऊलिन्हो, ब्राझील)

तणावाचे वातावरण
कॉन्फेडरेशन चषक विजेता उरुग्वे आणि यजमान ब्राझील यांच्यातील सामन्यादरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण होते. पाहुण्या संघाचा कर्णधार डिएगो लुगानो आणि ब्राझीलचा नेमार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली होती.

ब्राझील-स्पेन अंतिम सामना
यजमान ब्राझील आणि वर्ल्ड चॅम्पियन स्पेन यांच्यात कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. फुटबॉल विश्वातील दोन बलाढय़ संघ समोरासमोर येणार आहेत.

छायाचित्र - कॉन्फेडरेशन चषक फुटबॉल स्पर्धेत उरुग्वेविरुद्ध उपांत्य सामन्यात बायसिकल किक मारताना ब्राझीलचा फॉरवर्ड हुल्क.