आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Football : Cristal Palace Defeated, Arsenal On Top

फुटबॉल: क्रॅस्टल पॅलेसचा पराभव; आर्सेनल अव्वलस्थानी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- आर्सेनल टीमने पुन्हा एकदा इंग्लिश प्रीमियर फुटबॉल लीगच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. या टीमने क्रॅस्टल पॅलेसवर 2-0 अशा फरकाने एकतर्फी विजय मिळवला. या विजयाच्या बळावर आर्सेलने दोन गुणांनी आघाडी घेत मँचेस्टर सिटीवर कुरघोडी केली. यात 53 गुणांसह मँचेस्टर सिटीची दुस-या स्थानी घसरण झाली.
ओक्साल्डे-चाम्बार्लेनने (47,73 मि.) केलेल्या दोन गोलच्या बळावर आर्सेनलने सामना जिंकला. आर्सेलनला ईपीएलमधील हा 17 वा विजय ठरला. या टीमने आतापर्यंत ईपीएलमध्ये 24 सामने खेळले आहेत.
क्रॅस्टल पॅलेसने बलाढ्य आर्सेनलला मध्यंतरापर्यंत शून्य गोलने बरोबरीत रोखले. दरम्यान, या टीमकडून गोलसाठी चार वेळा प्रयत्न करण्यात आले. मात्र, प्रतिस्पर्धी टीमच्या गोलरक्षकाने हे प्रयत्न उधळून लावले. अखेर, दुस-या हाफमध्ये दुस-याच मिनिटाला आर्सेनलने 1-0 ने आघाडी नोंदवली. ओक्साल्डेने 47 व्या मिनिटाला ही किमया साधली. या आघाडीच्या बळावर आर्सेनलने सामन्यात दबदबा निर्माण केला. त्यानंतर 73 व्या मिनिटाला ओक्साल्डेने दुसरा मैदानी गोल केला. या गोलच्या बळावर त्याने आर्सेनलचा एकतर्फी विजय निश्चित केला. पिछाडीवर पडलेल्या पॅलेसचा गोलचे खाते उघडण्याचा प्रयत्न शेवटपर्यंत यशस्वी होऊ शकला नाही. यासह कॅ्रस्टल पॅलेसला ईपीएलमध्ये 15 व्या पराभवाला सामोरे जावे लागले.
ब्रोमविक-लिव्हरपूल लढत ड्रॉ
दुसरीकडे बलाढ्य लिव्हरपूलविरुद्ध लढतीत वेस्ट ब्रोमविक अल्बिओनने पराभवाचे सावट यशस्वीपणे दूर सारले. अनिचेबे (67 मि.) याने केलेल्या गोलच्या बळावर ब्रोमविकने लढतीत लिव्हरपूलला 1-1 ने बरोबरीत रोखले. स्टुरीडगेने 24 व्या मिनिटाला गोल करून लिव्हरपूलला 1-0 ने आघाडी मिळवून दिली होती. दरम्यान, पिछाडीवर पडलेल्या ब्रोमविकने बरोबरी मिळवण्यासाठी सुरूकेलेल्या प्रयत्नांना 67 व्या मिनिटाला यश आले.
क्रॅस्टल पॅलेसविरुद्ध गोल करण्याच्या प्रयत्नात आर्सेनलचा ओक्साल्डे.