आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल: काकाच्या दोन गोलच्या बळावर रियल माद्रिद विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅलेसिया - रियल माद्रिदने मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात डेपोर्टिव्हो ला कोरुनावर 4-0 ने एकतर्फी विजय मिळवला. काकाने (6, 85 मि.) केलेल्या सुरेख गोलच्या बळावर माद्रिदने सामना जिंकला. मोराटा (13 मि.) आणि कासेमिरोने (16 मि.) गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले.


सामन्याच्या सहाव्या मिनिटाला पाहुण्या माद्रिदने 1-0 ने आघाडी मिळवली. काकाने सुरेख खेळी करताना सामन्यात पहिला मैदानी गोल केला. त्यापाठोपाठ अवघ्या सात मिनिटांत मोराटोने संघाच्या आघाडीला 2-0 ने मजबूत केले. त्याने 13 व्या मिनिटाला सामन्यात मैदानी गोल केला. त्यानंतर तीन मिनिटांत रियल माद्रिदने प्रतिस्पर्धी संघावर 3-0 ने आघाडी मिळवली. कासेमिरोने 16 व्या मिनिटाला सामन्यात माद्रिदकडून तिसरा गोल केला. दरम्यान, कोरूनाने लढतीत गोलचे खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, माद्रिदच्या गोलरक्षकाने हे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडले. त्यामुळे शेवटच्या मिनिटापर्यंत या संघाला गोल करता आला नाही. प्रतिस्पर्धी संघाच्या गचाळ खेळीचा फायदा घेत माद्रिदने मध्यंतरापूर्वी मोठी आघाडी घेतली होती.