आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Football League: New Casal Lose, Totenham Entered In Final Round

फुटबॉल लीग : न्यूकॅसलवर मात; टॉटेनहॅम उपांत्य फेरीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : हेडरसाठी सामन्यात रंगलेली चुरस.
लंडन - जबरदस्त फॉर्मात असलेल्या टॉटेनहॅम हॉस्टपूरने इंग्लिश लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात न्यूकॅसल युनायटेडवर ४-० अशा फरकाने एकतर्फी विजयाची नोंद केली. यासह टॉटेनहॅमने लीगमधील आपली विजयी मोहीम अबाधित ठेवली. दुसरीकडे लिव्हरपूलनेही शानदार विजय मिळवला.

एन. बेंटालेब (१८ मि.), एन. चांडील (४६ मि.), काने (६५ मि.) आणि आर. साेलाडडाे (७० मि.) यांनी प्रत्येकी एक गोल करून टॉटेनहॅमला विजय मिळवून दिला.टॉटेनहॅमने दमदार सुरुवात करताना सामन्यात १-० ने आघाडी घेतली. बेंटालेबने सामन्यात १८ व्या मिनिटाला गोलचे खाते उघडले. यासह टॉटेनहॅमने मध्यतरांपूर्वी सामन्यात आघाडी मिळवली. त्यानंतर दुस-या हाफमध्ये चांडीलने संघाच्या आघाडीला २-० ने मजबूत केले. त्याने ४६ व्या मिनिटाला टॉटेनहॅमकडून दुसरा आणि वैयक्तिक पहिला गोल केला.

दरम्यान, न्यूकॅसल युनायटेडने सामन्यात गोलचे खाते उघडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले.
लिव्हरपूलची आगेकूच लिव्हरपूलनेही विजयी मोहीम कायम ठेवताना लीगच्या अंतिम चारमधील आपले स्थान निश्चित केले. या संघाने अंतिम आठमधील सामन्यात बोऊर्नमाउथला ३-१ अशा फरकाने पराभूत केले. रहीम स्ट्रेलिंग (२० , ५१ मि.) व लेझर मार्कविक (२७ मि.) यांनी संघाला विजय मिळवून दिला.