आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Football : Machestar City Defeated Blackburn Rovers By 5 0 Points

फुटबॉल : मँचेस्‍टर सिटीचा ब्लॅकबर्न रोवर्सवर 5-0 ने विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - मँचेस्टर सिटीने एफए चषक फुटबॉल स्पर्धेत ब्लॅकबर्न रोवर्सवर 5-0 अशा फरकाने मात केली. अल्वारो नेग्रेडो (45, 47 मि.) आणि एडीन डेझ्को (67, 79 मि.) यांनी केलेल्या गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने सामन्यात एकतर्फी विजय मिळवला. सर्जियो आयुर्गोनेही (73 मि.) सिटीच्या विजयात एका गोलचे योगदान दिले. रंगतदार लढतीत मँचेस्टर सिटीने मध्यंतरापूर्वी गोलचे खाते उघडले. नेग्रेडोने 45 व्या मिनिटाला ही किमया साधली. त्यापाठोपाठ त्याने 47 व्या मिनिटाला सिटीकडून दुसरा गोल केला. या गोलच्या बळावर मँचेस्टर सिटीने दोन मिनिटांच्या अंतरात 2-0 ने आघाडी मिळवली.
दरम्यान, डेझ्कोने 67 व्या मिनिटाला सिटीच्या आघाडीला 3-0 ने मजबूत केले. दरम्यान, त्याने वैयक्तिक पहिला आणि सिटीकडून तिसरा गोल केला. त्यानंतर 73 व्या मिनिटाला आयुर्गोने एका गोलचे योगदान दिले. त्यापाठोपाठ अवघ्या सहा मिनिटांत मँचेस्टर सिटीने 5-0 ने सामन्यात आपला विजय निश्चित केला. डेझ्कोने हा शेवटचा गोल केला.
रोनाल्डोचा गोल; माद्रिद विजयी
कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत रिअल माद्रिदने ओसासुनावर 2-0 ने एकतर्फी विजय मिळवला. फिफाचा बॅलन डी ओर पुरस्कार विजेत्या क्रिस्टियानो रोनाल्डो (22 मि.) आणि डी मारियाने(56 मि.) केलेल्या गोलमुळे माद्रिदने सामना जिंकला. रोनाल्डोला प्रेक्षकांनी जोरदार पाठिंबा दिला.