आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटली-ब्राझील लढत बरोबरीत; जॉर्डन विजयी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनेव्हा- येथील मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण फुटबॉल सामन्यात इटली व ब्राझील यांच्यातील लढत 2-2 ने बरोबरीत राहिली.

सामन्याच्या 33 व्या मिनिटाला ब्राझीलने गोलचे खाते उघडले. फ्रेडने इटलीच्या गोलरक्षकाला हुलकावणी देऊन पहिला गोल केला. या संघाने त्यानंतर अवघ्या नऊ मिनिटात 2-0 ने आघाडी मिळवली. सामन्याच्या 42 व्या मिनिटाला ऑस्करने वैयक्तिक पहिला व संघाकडून दुसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत 0-2 ने पिछाडीवर पडलेल्या इटलीने पहिला गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. मात्र, त्यांना यश मिळाले नाही. दुसर्‍या हाफमध्ये डे रोस्सी आणि मारियो बालोटेलीने पराभवाचे सावट दूर करण्यात यश मिळवले. डे रोस्सीने 54 व्या मिनिटाला इटलीकडून पहिला गोल नोंदवला. त्यानंतर तिसर्‍याच मिनिटाला मारिया बालेटेलीने गोल करून इटलीला 2-2 ने बरोबरी मिळवून दिली.