आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Football News In Marathi, Brazil, South Africa, Sport

फुटबॉल: नेमार चमकला; ब्राझीलची दक्षिण आफ्रिकेवर मात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस - नेमारने केलेल्या बेफाम हॅट्ट्रिकच्या बळावर विश्वचषकाचा यजमान असलेल्या ब्राझीलने दक्षिण आफ्रिकेला 5 - 0 असे पराभूत केले, तर लियोनेल मेसीच्या आजारपणामुळे संथ खेळलेल्या अर्जेंटिनाला रोमानियाशी 0 -0 ने बरोबरीवर समाधान मानावे लागले.


फुटबॉल विश्वचषकाला आता केवळ 99 दिवस शिल्लक असताना बुधवारी खेळल्या गेलेल्या मैत्रीपूर्ण सामन्यांमध्ये प्रचंड चुरस दिसून आली. ब्राझीलच्या खेळाडूंनी अफलातून खेळ करीत दक्षिण आफ्रिकेला मोठय़ा फरकाने पराभूत केले. ब्राझील विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या प्रारंभानंतर दहाच मिनिटांत ऑस्करने पहिला गोल लगावला. नेमारने प्रथम पूर्वार्धात एक, तर उत्तरार्धात दोन असे तीन गोल लगावत संघाला मोठय़ा फरकाने विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. केवळ निकालाकडे पाहिले तर ब्राझीलने संपूर्ण सामन्यावर वर्चस्व गाजवल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात दक्षिण आफ्रिकेनेदेखील चांगला खेळ केला असल्याचे ब्राझीलचे फिलीप स्कोलरी यांनी नमूद केले.


अर्जेंटिनाचे बरोबरीत समाधान
दोन वेळचा विजेता असलेल्या अर्जेंटिनाला बुखारेस्ट येथील मैदानावर रोमानियाशी विजयासाठी झगडावे लागले. मेस्सीच्या आजारपणामुळे त्यांच्या खेळातील आक्रमकता कुठे तरी हरवल्याचे चित्र होते. त्यामुळे या रंगतदार सामन्यात त्यांना रोमानिया संघाशी गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले.