आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉल विश्वात डेव्हिड बेकहॅम सर्वांत महागडा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पॅरिस- इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅम अद्यापही जगात सर्वात महागडा फुटबॉलपटू आहे. त्याने जानेवारीत पॅरिस सेंट र्जमनसोबत करारबद्ध केला. तो सध्या फुटबॉल विश्वातील बार्सलिोनाचा लियोनेल मेसी आणि रियल माद्रिदचा क्रिस्टियानो रोनाल्डो या दिग्गजांमध्ये वार्षिक कमाईत सर्वात पुढे आहे. 2012-13 मध्ये बेकहॅमची 4.75 कोटी डॉलर इतकी कमाई होणार आहे. जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू मेसीला मिळणार्‍या मानधनापेक्षा ही रक्कम मोठी आहे.

फ्रान्स फुटबॉलच्या अहवालानुसार बेकहॅमला या सत्रात जवळजवळ पावणे पाच कोटी डॉलर मिळणार आहेत. यामुळे तो फिफाचा चार वेळचा सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू मेसीच्या पुढे जाईल. गतवर्षी डिसेंबरमध्ये अमेरिकेतील र्शीमंत क्लब लॉस अँजेलिस गॅलेक्सीला सोडणार्‍या बेकहॅमला वर्षाकाठी 17 लाख युरो इतके वेतन मिळते. याशिवाय त्याला 13 लाख युरो इतकी रक्कम बोनस आणि तीन कोटी 30 लाख युरो जाहिरात करार आणि इतर स्रोतांतून मिळतात.

दुसरीकडे लियोनेल मेसीची साडेतीन कोटी युरोची कमाई आहे. यामध्ये वेतन, बोनसचे एक कोटी 30 लाख युरो आणि जाहिरातीतून मिळणार्‍या रकमेचा समावेश आहे. माद्रिदचा क्रिस्टियानो रोनाल्डो तिसर्‍या स्थानावर आहे. त्याची कमाई तीन कोटी युरो आहे.

जोस मेरिन्हो महागडे कोच- फुटबॉलच्या विश्वात जोस मोरिन्हो हे सर्वात महागडे कोच आहे. सध्या रियल माद्रिदचे कोच असलेल्या मोरिन्होची वार्षिक कमाई 1 कोटी 40 लाख युरो आहे. एवढी रक्कम मिळणारे ते एकमेव प्रशिक्षक ठरले आहेत.