आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Football Player Lionel Macy Comeback For Spanish League

मेसी स्पॅिनश लीगमध्ये परतला! दमदार पुनरागमनासह चाहत्यांची ज‍िंकली मने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बार्सिलोना- एल्शेविरुद्धच्या सामन्यात लियोनेल मेसीने बहारदार खेळाचे प्रदर्शन घडवत केलेल्या दोन गोलच्या बळावर बार्सिलोनाने स्पॅनिश लीगमध्ये विजयी अभियानाने प्रारंभ केला. गत मोसमातील निराशाजनक कामगिरीचा विचार मनातून काढून टाकत मेसीने अत्यंत सकारात्मक खेळ केल्यानेच बार्सिलोनाला ३-० असा शानदार विजय मिळवणे शक्य झाले आहे.

मेसीने खास त्याच्या शैलीत ४२ व्या मिनिटाला गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. एल्शेच्या गॅरी रॉड्रिग्जला अडथळा केल्याने बार्सिलोनाच्या जॅवियर मॅस्करॅनोला लाल कार्ड दाखवून थेट मैदानाबाहेर काढण्यात आले. त्यामुळे पूर्वार्धापासूनच बार्सिलोनाचा संघ दहा खेळाडूंसह खेळत होता. तरीदेखील मेसीने आघाडी मिळवून दिल्याने बार्सिलोनाच्या पाठीराख्यांचा उत्साह वाढला. त्यानंतर नेमारऐवजी मैदानावर उतरवण्यात आलेला फुटबॉलपटू मुनीर अल हदादीने दुसरा गोल करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तर उत्तरार्धात ६३ व्या मिनिटाला मेसीने बचाव फळीला भेदत पुन्हा एक अफलातून गोल करीत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. दरम्यान, अन्य सामन्यांमध्ये एलिबारने रिअल सोसीडॅडवर १० तर सेल्टा व्हिगोने गेटाफेवर ३-१ असा विजय मिळवला.
मँचेस्टर युनायटेड-सदरलँड सामना १-१ ने बरोबरीत
लंडन- इंग्लिश प्रीिमयर लीग फुटबॉल स्पर्धेतील मजबूत संघ मँचेस्टर युनायटेडला तुलनेने दुबळ्या मानल्या जाणाऱ्या सदरलँडविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. हा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. युनायटेडचा आघाडीचा खेळाडू माटाने आक्रमक सुरुवात करताना सामन्याच्या १७ व्या मिनिटाला गोल करून संघाला आघाडी मिळवून दिली हाेती.

टोटेनहॅमचा क्वीन्स पार्क रेंजर्सवर ४-० ने विजय
टोटेनहॅमने दमदार सुरुवात करताना क्वीन्स पार्क रेंजर्स (क्यूपीआर) संघाला ४-० ने हरवले. टोटेनहॅमकडून चाडलीने दोन गोल केले. त्याने १२ व्या मिनिटाला गोल करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. यानंतर ३० व्या मिनिटाला डायरने, तर ३७ व्या मिनिटाला पुन्हा चाडलीने गोल केला. अॅडबेयरने ६५ व्या मिनिटाला संघाची आघाडी ४-० अशी केली हाेती.

३-० ने बार्सिलोनाचा शानदार विजय
४२ व्या मिनिटाला मेसीचा पहिला गोल
६३ व्या मिनिटाला सामन्यात मेसीचा दुसरा गोल

हदादीचे योगदान
नेमारच्या जागी संघात खेळायला मिळालेल्या संधीचे हदादीने साेने केले. त्याने संघाच्या विजयात एका गाेलचे याेगदान दिले.

नशीब आमच्या बाजूने : मेसी
मोसमातील बार्सिलोनाच्या सामन्यापूर्वी मेसीने एक ट्विट केले आहे. त्यात नशीब आमच्या बाजूने असून निदान हा मोसम तरी चांगला जाईल, अशी आशा व्यक्त केली आहे. तसेच आज पहिलाच सामना असून चांगली लढत होईल, असे मतदेखील व्यक्त केले आहे. मेसीने पहिल्या सामन्यातील त्याच्या खेळाने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत.