आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुटबॉल: रुनीचे प्रयत्न अपयशी; मँचेस्टर- चेल्सी बरोबरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर- ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर रंगलेल्या सामन्यात मॅँचेस्टर युनायटेडकडून खेळणार्‍या वायने रुनीने जोरदार प्रयत्न करूनदेखील तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. त्यामुळे प्रीमियर लीगमधील मॅँचेस्टर युनायटेड आणि चेल्सी या दोन दिग्गज संघांमधील सामना 0- 0 असा अनिर्णीतावस्थेत संपला.


मोसमातील पहिल्या सामन्याचा प्रारंभ करणार्‍या दोन्ही संघांनी विजयी आघाडी घेण्यासाठी केलेली सर्व आक्रमणे निष्फळ ठरली. इंग्लंडचा स्टार फुटबॉलपटू वेन रुनी याने तीन वेळा गोल करण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र, तो यशस्वी ठरू शकला नाही. रुनीचा युनायटेड संघातील समावेश हा संघाच्या चाहत्यांसाठी अत्यंत उत्साहदायी ठरला. मात्र चेल्सीचा संघदेखील तसूभरही कमी पडला नाही. फर्नांडो टोरेस आणि रोमेलू लुकाकू या दोन बड्या खेळाडूंना पूर्वार्धात मैदानावर न उतरवतादेखील चेल्सी बरोबरी राखण्यात यशस्वी ठरला. टोरेसला यलो कार्ड दाखविण्यात आले.