आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Footballer Bite To Anothar Player Issue In Fifa World Cup, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाईट वर्तवणूक खराब कामगिरीपेक्षा घातक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नटाल- मंगळवारी जे घडले त्यावर कुणीही क्रीडाप्रेमी, पत्रकार, जाणकार आणि अधिकार्‍याचा विश्वास बसत नव्हता. सुआरेझ पुन्हा एका खेळाडूला चावला? तेही विश्वचषकात? सार्‍या जगासमोर? उरुग्वेचा हा स्ट्रायकर आपल्या कारकीर्दीत तिसर्‍यांदा खेळाडूला चावल्यामुळे वादात अडकला आहे.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उरुग्वेचे व्यवस्थापक ऑस्कर तबरेज यांनी सुआरेझचा जोरदार बचाव केला. पत्रकारांच्या प्रश्नांचा भडिमार म्हणजे एक कट असल्याचे ते सांगत होते. पराभवाने निराश झालेल्या ब्रिटिश माध्यमांचा हा कट असल्याची मल्लिनाथी त्यांनी केली. इतकेच नव्हे तर उरुग्वेच्या एका पत्रकाराने तबरेज यांच्या उत्तराचे कौतुक केले. तबरेज काही म्हणो, टीव्हीवर दिसणारी छायाचित्रे सारे काही सांगून जात आहेत. चित्रफितीत सुआरेझ जॉजिर्ओ चेलिनीचा चावा घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. माध्यमांनी सुआरेझच्या कृतीचा निषेध केला आहे. मैदानावर खेळाडूला चावा घेण्याची ही त्याची तिसरी वेळ आहे. मात्र या वेळी प्रकरण जास्तच पेटले आहे.
सुआरेझ दोषी आढळल्यास फिफा 24 सामन्यांची बंदी घालू शकते. सुआरेझ महागड्या फुटबॉलपटूंपैकी एक आहे. विश्वचषक सुरू व्हायच्या आधी सुआरेझशी करार करण्यास इच्छुक असणार्‍या क्लबनी अंतिम निर्णय टाळला होता.