आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Footballer Cristiano Ronaldo Latest News In Divya Marathi

बालकाच्या उपचारासाठी रोनाल्डोने दिले 51 लाख रूपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माद्रिद- स्पेनच्या रियाल माद्रिद क्लबकडून खेळणारा पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो तितकाच दानशूरही आहे. एका 10 महिन्यांच्या चिमुरड्याच्या उपचारासाठी त्याने 51 लाख रुपयांची (83 हजार डॉलर) मदत केली आहे. स्पेनच्या ‘एएस’ दैनिकाने हे वृत्त दिले आहे. सर्वात्तम फुटबॉलपटू रोनाल्डोने कॉर्टिकल डिस्प्लासिया नामक आजाराने ग्रस्त एरिक ओर्टिज क्रुझच्या उपचारासाठी ही रक्कम दिली आहे. कॉर्टिकल डिस्प्लासिया हा एक गंभीर मानसिक आजार आहे. उपचार खर्चही मोठा आहे.
भारतीय कंपनीचा मेस्सीशी करार
भारताची सेलिब्रिटी कॉर्मस कंपनी कलेक्टेबिलियाने चार वेळचा बेलोन डियोर विजेता स्टार फुटबॉलपटू लियोन मेस्सीबरोबर करार केला आहे. या कराराअंतर्गत कंपनीच्या मोबाइल, लॅपटॉप आणि टॅब्लेट कव्हर्सच्या निर्मितीत मेस्सीचे सहकार्य मिळेल.
भारताचा माझ्यावर प्रचंड प्रभाव
मेस्सीने सांगितले की, आपल्यावर भारताने प्रचंड छाप पाडली आहे. अज्रेंटिना संघासमवेत 2011 मध्ये मेस्सी भारतात आला होता. व्हेनेज्युयेगाविरुद्ध फुटबॉलचा एक मैत्रिपूर्ण सामना कोलकात्यात आयोजित करण्यात आला होता.
बूट आणि जर्सी दान करायला सांगितले होते
रोनाल्डोला क्रुझच्या उपचारासाठी त्याचे बूट आणि जर्सी दानच्या स्वरुपात मागण्यात आले होते. ते विकून शस्त्रक्रियेसाठी लागणारे 60, 000 हजार युरो जमा करण्याचा उद्देश होता. रोनाल्डोने मागचापुढचा विचार न करता चिमुरड्याच्या उपचाराचा सारा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. अशा प्रकारची समाजसेवा तो नेहमीच करत आला आहे. 2012 मध्ये कर्करोगाने ग्रस्त एका 9 वर्षाच्या चाहत्याच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलला होता.
पुढील स्‍लाईडवर पहा 10 म‍हिन्‍यांचा क्रूझ...