आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिस्‍पर्ध्‍याला चावल्‍यामुळे फुटबॉलपटूला मिळाला 100 कोटी रुपयांचा झटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्राझीलमध्येनुकत्याच पार पडलेल्या फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान इटलीचा खेळाडू जॉर्जियो चिलि‍नीच्या खांद्याचा चावा घेतल्यामुळे उरुग्वेचा स्ट्रायकर लुइस सुआरेजवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्याला आता या सवयीपासून मुक्ती मिळवायची असून यासाठी तो तज्ज्ञांचा सल्ला घेत आहे. उल्‍लेखनिय म्‍हणजे त्‍याला चावा घेतल्‍यामुळे 100 कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागले.

सॉकरवे डॉट कॉम या संकेतस्थळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, चिलिनीच्या खांद्याला घेतलेल्या चाव्याने जगभरातून झालेल्या टीकेमुळे व्यथित झाल्याचे सुआरेजने मान्य केले आहे. या विवादित प्रकरणामुळे इंग्लिश प्रीमियर क्लब लिव्हरपूलमधून त्याला डच्चू मिळाला होता आणि आता त्याचा जगातील अव्वल फुटबॉल क्लब असलेल्या बार्सिलोनाच्या संघात समावेश झाला आहे. बार्सिलोना संघ व्यवस्थापनाने मंगळवारी त्याला माध्यमांसमोर आणले. या वेळी त्याने चावा प्रकरणातून मुक्ती मिळवण्याची गोष्ट केली. सुआरेजने म्हटले की, मी सत्याचा स्वीकार करतो आणि यासाठी सर्वांची क्षमाही मागतो. भूतकाळात जी गोष्ट घडून गेली, आता ती विसरून जायला हवी. माझ्यावर लागलेली बंदी अद्यापही सुरूच असून त्याचा मी सन्मान करतो, असेही त्याने या वेळी म्हटले. चावा घेणे ही माझी वैयिक्तक बाब आहे आणि त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी मी सध्या प्रयत्न करतोय. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे सुरू असल्याचे सुआरेजने या वेळी म्हटले.

यापूर्वी दोनदा खेळाडूंना चावला
फिफा विश्वचषक स्पर्धेत इटलीच्या चिलिनीच्या खांद्याचा चावा घेण्यापूर्वी सुआरेजने एकदा प्रतिस्पर्धी खेळाडूचा चावा घेतला होता. जागतिक स्तरावर अशा प्रकारचे कृत्य केल्याप्रकरणी फिफाने त्याच्यावर चार महिने आणि नऊ सामन्यांची बंदी घातली होती. शिवाय, कोणत्याही प्रकारच्या फुटबॉल कार्यक्रमात सहभागी होण्यास, सरावास तसेच मैदानात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सुआरेझने प्रतिस्‍पर्धकाला चावा घेतल्‍याचे क्षणचित्रे..