आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुटबॉलचे 680 सामने फिक्सिंगचे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेग- जगात सर्वात लोकप्रिय असलेल्या फुटबॉलच्या मानगुटीवरही आता फिक्सिंगचे भूत बसले आहे. युरोप, आफ्रिका आणि दक्षिण-मध्य अमेरिकेत झालेले 680 सामने फिक्स झाले होते. यातील 380 सामने हे युरोपात फिक्स झाले. हे सर्व सामने 2008 ते 2011 दरम्यान खेळवले गेले आहेत. यामध्ये विश्वचषक पात्रता फेरीतील सामन्यांचाही समावेश आहे, असा दावा युरोपच्या चौकशी अधिका -याने केला आहे. या वेळी संशयित सामन्यांची चौकशी सुरू करण्यात आली. युरोपियन गुन्हेगारीविरोधी संस्था युरोपोलने हा फिक्सिंगचा प्रकार चव्हाट्यावर आणला आहे.
‘संयुक्तपणे केलेल्या चौकशीत 15 देशांमधील एकूण 425 भ्रष्ट अधिकारी, खेळाडूंची ओळख पटली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. आम्ही दोषींची नावे सध्या जाहीर करणार नाहीत,’ असे युरोपोलचे प्रमुख रॉब वेनराइट म्हणाले.

सिंगापूरमध्ये गोरखधंदा- फुटबॉलच्या विश्वाला हादरा देणा -या फिक्सिंगच्या गोरखधंद्याचे मुख्य ठिकाण सिंगापूर आहे. या ठिकाणावरून सर्व काही हालचाली होत. फिक्सिंगच्या संशयित सामन्यांत अनेक स्टार खेळाडूंचा समावेश असल्याची शक्यता आहे. आमच्याकडे एकूण 150 प्रकरणांतील पुरावे आहेत, अशी माहिती जर्मनीचे चौकशी अधिकारी फ्रेंडहेल्म अ‍ॅथेल्सने दिली.

या सामन्यांवर संशय- विश्वचषक पात्रता फेरीतील सामने, युरोपियन स्पर्धा, चॅम्पियन्स लीग, आशियाई स्पर्धा
एक लाख युरोंची लाच : प्रत्येक सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी एक लाख युरोंची (72.26 लाख) लाच पंच व खेळाडूंना दिली जात होती. ही रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची खास यंत्रणाही तयार केली आहे. यासाठी इटरनेटचाही वापर केला जात आहे.

मात्र, फिफाचा नकार : फुटबॉलमधील फिक्सिंगला फिफाने दुजोरा दिला आहे.मात्र, विश्वचषक पात्रता फेरीच्या सामन्यातील गैरव्यवहाराच्या संशयाला चुकीचे ठरवले आहे. ‘विश्वचषक ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा असते. यामध्ये कोणताही खेळाडू, पंच फिक्सिंगचा प्रयत्न करू शकत नाही. आम्ही सर्व यावर नजर ठेऊन असतो,’असे फिफाचे राल्फ मुश्के म्हणाले.