न्यूयॉर्क - भारतीय
क्रिकेट संघाचा कर्णधार महेद्रसिंह धोनी फोर्ब्सच्या यादीमध्ये सर्वांधीक पैसा कमविणा-या खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय आहे. अमेरिकेचा बास्केटबॉलपटू लिब्रोन जेम्स प्रथम स्थानी आहे. गोल्फर टाइगर वुड्स, टेनिस स्टार
रोजर फेडरर आणि
राफेल नदाल हे खेळाडू धोनीपेक्षा वरच्या स्थानी आहेत.
धोनी 2014 मध्ये 2 कोटी डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह पाचव्या स्थानी आहे. गेल्या वर्षी त्याची ब्रँड व्हॅल्यू दोन कोटी 10 लाख डॉलर होती.
फोर्ब्सने म्हटले की, धोनीने स्पार्टन स्पोर्ट्स आणि एमिटी यूनिव्हर्सिटी सोबत 2013 च्या सरतेशेवटी करार केला होता. ज्यामुळे त्याला एकूण 40 लाख डॉलर (वार्षिक) आणि
रिबॉक सोबत 10 लाख डॉलरचा करार केला होता.
जाहिरातून मिळविलेल्या पैशामध्ये जेम्स 3 कोटी 70 लाख डॉलर ब्रँड व्हॅल्यूसह प्रथम स्थानी आहे. 2007 नंतर प्रथम शीर्षस्थानी नाही. वुड्स 3 कोटी 60 लाख डॉलर की ब्रँड व्हॅल्यूसह दुस-या स्थानी आहे.
तिस-या क्रमांकावर फेडरर असून त्याची 2014 ची ब्रँड व्हॅल्यू 3 कोटी 20 लाख डॉलर आहे. धावपटू युसेन बोल्ट, स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो 7व्या स्थानी आणि लियोनेल मेस्सी 9 व्या स्थानी आहे. तर दहाव्या स्थानी राफेल नदाल आहे.
ही सूची फोर्ब्स फॅब 40 चा एक भाग आहे. ज्यामध्ये व्यवसाय, इव्हेंट, टीम आणि खेळाडूंचे 10 सर्वांत किंमती ब्रँड यांचा सहभाग आहे. खेळ व्यवसायात ब्रँड नायकेची ब्रँड व्हॅल्यू 19 अब्ज् डॉलर आहे. तर इव्हेंट ब्रँडमध्ये सुपर बाउल प्रथम स्थानी आहे. ज्यामध्ये प्रसारण, तिकिट, हाफटाइम शो, लाइसेंसिंग अंदाजे 51 करोड़ 80 लाख डॉलर आहे. प्रसध्दि बेसबाल टीम न्यूयार्क यांकीज सर्वांत किंमती ब्रँडमध्ये मोडते. ज्याची व्हॅल्यू अंदाजे 52 कोटी 10 लाख डॉलर आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, टॉप-10 खेळाडूंचा ब्रँड व्हॅल्यू