आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Force India Unique Centure; Wetal Again Champion

फोर्स इंडियाचे अनोखे ‘शतक’; वेटल पुन्हा चॅम्पियन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोट्रेयल - सहारा फोर्स इंडिया या फॉर्म्युला-1 टीमने रविवारी अनोखे शतक झळाकावले. या शतकाचा आनंदोत्सवही या टीमने जल्लोषात साजरा केला. विजय मल्ल्या यांच्या टीमने फॉर्म्युला-1 च्या विश्वातील 100 वी रेस पूर्ण केली. तसेच कॅनेडियन ग्रांप्री एफ-1 मध्ये पॉल डी रेस्टाने सातवे आणि ए. सुतीलने दहावे स्थान गाठून फोर्स इंडियाच्या शतकाचा आनंद द्विगुणित केला.


2008 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रांप्रीपासून फोर्स इंडियाने आंतरराष्टÑीय एफ-1 स्पर्धेला प्रारंभ केला. या टीमने कॅनेडियन ग्रांप्रीतील सहभागासह आपली 100 वी रेसही पूर्ण केली. या टीमने केवळ एकदा पोल पोझिशन मिळवले होते.


सेबेस्टियन वेटल सर्वात वेगवान
कॅनेडियन ग्रांप्री एफ-1 रेसमध्ये रेडबुलचा सेबेस्टियन वेटल सर्वात वेगवान ड्रॉयव्हर ठरला. त्याची ही करिअरमधील 29 वी ट्रॉफी ठरली. त्याने पोल पोझिशनवरून स्पर्धेला सुरुवात करताना तीन वेळचा वर्ल्ड चॅम्यिपन फर्नांडो अलोन्सोला मागे टाकून प्रथम क्रमांक पटकावला.


टॉप-5 संघ
1. रेडबुल
2. फेरारी
3. मर्सिडीझ
4. लोटस
5. फोर्स इंडिया


फोर्स इंडियाविषयी
पूर्ण नाव : सहारा फोर्स इंडिया
मालक : विजय मल्ल्या
स्थापना :1991 (सिल्व्हरस्टोन )
पहिली रेस : 2008 ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
बेस : सिल्व्हरस्टोन, यूके
तांत्रिक संचालक : अँड्र्यू ग्रीन
सीओओ : ओटमार स्झाफनार
इंजिन : मर्सिडीझ-बेंझ
टायर्स : पिरेल्ली
पोल पोझिशन : 01 वेळ