आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांचे निधन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा- भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी सचिव जयवंत लेले यांचे शुक्रवारी पहाटे वडोदरा येथे राहत्‍या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा आणि मुलगी आहे. लेलेंनी तीन दिवसांपूर्वीच 75 वा वाढदिवस मोठ्या उत्‍साहात साजरा केला होता.

लेले यांनी 1996 ते 2001 या कालावधीत बीसीसीआयचे सचिव म्‍हणून काम पाहिले होते. याच कालावधीत क्रिकेटला काळीमा फासणारे मॅच फिक्सिंग प्रकरण उघडकीस आले होते. 'व्हेन आय वॉझ देअर' हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. या आत्मचरित्रातून त्‍यांनी मॅच फिक्सिंग प्रकरणावर भाष्‍य केले होते.

तीन दिवसांपूर्वीच 16 सप्‍टेंबरला लेलेंनी नातेवाईक, मित्रपरिवारासोबत 75वा वाढदिवस जल्लोषात साजरा केला होता. या कार्यक्रमाला वडोदरा क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयचे अनेक सदस्यही उपस्थित होते. काही आजी-माजी क्रिकेटपटुंनीही या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.