आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी कर्णधारांचा धोनीबाबत ‘यू टर्न’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नईनंतर आता हैदराबादेतही ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला शानदार विजय मिळवून दिला आहे. या विजयामुळे माजी क्रिकेटपटूंचा सूर बदलला आहे. इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर धोनीवर टीका करणारे आता त्याची स्तुती करीत आहेत.

बिशनसिंग बेदी
तेव्हा : धोनी कसोटी कर्णधार म्हणून अपयशी आहे. त्याला निलंबित केले पाहिजे. धोनी कसोटीत नेतृत्वाला सक्षम नाही. ज्याची प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा निश्चित असते, असा कर्णधार आम्हाला हवा आहे.
आता : धोनीचा चिवटपणा जबरदस्त आहे. शांत राहून प्रकरण निकाली लावणे, हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो नव्या खेळाडूंचा योग्यपणे उपयोग करीत आहे. धोनी आजघडीला उत्तम कर्णधार आहे.

कपिलदेव
तेव्हा : विराट कोहलीला नेतृत्वासाठी ग्रुम केले पाहिजे. तो टेस्ट मटेरियल आहे.
आता : धोनी माझ्यापेक्षा उत्तम कर्णधार आहे. त्याने भारताला दोन वर्ल्डकप जिंकून दिले आहेत.

गावसकर
तेव्हा : धोनीला कसोटी कर्णधार म्हणून बदलण्याची वेळ आता आली आहे. त्याला बरीच संधी मिळाली असून, पुढचा विचार करावा.
आता : माझ्या मते, आता कर्णधारपदाची चिंता आपण सर्वांनी सोडली पाहिजे. महेंद्रसिंग धोनीनेच नेतृत्व करावे.

गांगुली होता पाठीशी
माजी क्रिकेटपटू धोनीला कर्णधारपदावरुन बरखास्त करण्याची मागणी करीत होते त्या वेळी सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी धोनीचे समर्थन केले होते. धोनीला आणखी संधी द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले होते. 15 दिवसांपूर्वी धोनीवर टीका करणारे आता त्याची स्तुती करीत आहेत, असे आश्चर्य गांगुलीने व्यक्त केले.

धोनीचा विरोध महागात
निवड समितीचे सदस्य मोहिंदर अमरनाथ यांनी निवड समितीच्या बैठकीत धोनीला कर्णधारपदावरून दूर करण्याची मागणी केली होती. मी मागे सरकणार नाही आणि नेतृत्वाचे आव्हान पेलेन, असे म्हणणारा धोनी कोण आहे, असेही अमरनाथ यांनी म्हटले होते. या विधानानंतर अमरनाथ यांनी निवड समितीचे पद गमावले.