आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Cricketer Kapil Dev Opens His Pakistan Connection, News In Marathi

कपिलदेवने उघडले रहस्‍य, ''पाकिस्‍तानमधील गावामध्‍ये फक्‍त माझेच होते पक्‍के घर''

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(माजी क्रिकेटपटून कपिल देव पत्‍नी रोमी आणि मुलगी आमिया सोबत)
भारताचा माजी दिग्‍गज क्रिकेटपटू कपिल देवने एका पाकिस्‍तानी वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये म्‍हटले की, 'त्‍याचे आई-बाबा पाकिस्‍तानमध्‍ये राहत होते. भारत पाकिस्‍तान फाळणीनंतर ते भारतात आले. पाकिस्‍तामध्‍ये फक्‍त त्‍यांचेच घर तेवढे पक्‍के होते असेही त्‍यांनी सांगितले.
भारतीय क्रिकेटमधील एक मोठी हस्‍ती कपिल देव अर्जुन पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष आहेत. तसेच अनुभवी समालोचक आहेत. जाणून घ्‍या त्‍यांच्‍या खासगी जीवनाविषयी काही पैलू.
पाकिस्‍तानातील मोंटगोमरीमध्‍ये राहत होती आई
कपिलदेवचा जन्‍म चंदीगडमध्‍ये झाला. भारत-पाकिस्‍तान फाळणीपूर्वी त्‍यांचे पालक पाकिस्‍तामधील मोंटगोमरी (आता सहिवाल) या ठिकाणी राहत होते.
चार बहीणी पाकिस्‍तानात आणि भावांचा जन्‍म भारतात
कपिल एक धाडसी व्‍यक्‍तीमत्‍वाचा आहे. परंतु त्‍याच्‍या खासगी आयुष्‍यात तो फार भावनिक आहे. कपिलला चार बहीणी आणि तीन भाऊ आहेत. त्‍यापैकी बहीणींचा जन्‍म पाकिस्‍तानातील असून भावाचा जन्‍म भारतात झाला आहे.
पाकिस्‍तान दौ-यावेळी गावाला भेट
कपिल देवने सांगितले की, 'त्‍यांच्‍या आईचा जन्‍म पाकिस्‍तानच्‍या पाकपट्टम जिल्‍ह्यामध्‍ये झाला. जेव्हा कपिल क्रिकेटच्‍या निमित्‍ताने पाकिस्‍तान दौ-यावर गेले होते त्‍यावेळी त्‍यानी पाकिस्‍तानमधील घराला भेट दिली होती.'
पुढील स्‍लाइडवर वाचा कपिलच्‍या जीवनाविषयी..