लंडन- इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने लॉर्ड्स मैदानावर सर्वात उंच झेल पकडून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकार्डमध्ये नाव झळकावले आहे. 14 जुलै पासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरु होणा-या पहिल्या कसोटीआधी लॉर्ड्सवर आयोजित केलेल्या एका स्पर्धेत 48 वर्षीय नासिरने ड्रोनच्या मदतीने सर्वात उंच झेल घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला. माजी इंग्लिश क्रिकेटरने 150 फू उंचावरील तासी 119 किमी वेगाने खाली येणारा चेंडू सहज पकडला.
150 फूट उंच चेंडू असा पोहचला...
- बॅटकॅम ड्रोनच्या मदतीने चेंडूला 150 फुट उंचावर खाली फेकण्यात आले जो झेल नासिरने टिपला.
- या स्पर्धेत नासिरला एकून तीन संधी देण्यात आल्या. पहिल्या ड्रोनच्या चेंडूची उंची जमिनीपासून 100 फुट उंच होती.
- तर, दुस-या आणि संधीत ही उंची वाढवून 150 फूट केली गेली.
- तो चेंडू पकडून नासिरने नविन वर्ल्ड रिकॉर्ड बनवला.
2004 मध्ये घेतली होती निवृत्ती
- इंग्लंडकडून 96 कसोटी खेळलेल्या नासिरने वर्षे 2004 मध्ये निवृत्ती घेतली होती.
- बॅटकॅम ड्रोनच्या मदतीने पहिला चेंडू 104 आणि नंतर 160 फूट उंचीवरून खाली फेकण्यात आले.
पुढे स्लाईड्सच्या मदतीने पाहा, नासिर हुसेनद्वारे घेतलेला अनोखा कॅचचा फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)