आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Captain Sourav Ganguly Latest News In Divya Marathi

सचिन असो किंवा \'किंग खान\' सर्वांना मान्‍य आहे सौरव दादाची दबंगगिरी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेटच्‍या इतिहासामध्‍ये 11 मार्च 2001 हा दिवस सोनेरी अक्षराने लिहला गेला. बॉर्डर- गावस्‍कर ट्रॉफीसाठी ऑस्‍ट्रोलियाच्‍या विरोधात कोलकाताच्‍या इडन गार्डनवर खेळण्‍यात आलेला हा सामना होता. टर्मिनेटर म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या हरभजनसिंगने पहिल्‍या प्रयत्‍नातच हॅट्रीक केली. व्‍हीव्‍हीएस लक्ष्‍मणने 281 धावा या सामन्‍यात काढल्‍या आणि भारतीय संघाचा विजय झाला.
आज आम्‍ही तुम्‍हाला भारतीय क्रिकेट संघातील यशस्‍वी कर्णधारापैकी माजी कर्णधार सौरव गांगुलीविषयी माहिती देणार आहोत.
इडन गार्डनवरचा सामना भारताने 171 धावाच्‍या फरकाने जिंकला. या सामन्‍यात भज्जीने केलेली हॅट्रीक, लक्ष्‍मणचे दुहेरी शतक या गोष्‍टी आपल्‍याला माहित आहेत. मात्र या सामन्‍याचे नियोजन आणि आखणी करणा-या कर्णधार सौरव गांगुलीला मात्र आपण विसरून जातो.
काही फॅक्‍ट्स ज्‍या क्रिकेटमधील गांगुलीला ठरवतात दबंग
सौरव गांगुली पश्चिम बंगालचा असल्‍यामुळे सर्व क्रिकेटर आणि त्‍याचे चाहते त्‍याला 'दादा' म्‍हणून ओळखतात. सौरवचे क्रिकेट करिअर त्‍याला दबंग बनवते. सौरवचे असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे क्रिकेटचा बादशाहा सचिन तेंडुलकरदेखील तोडू शकला नाही. सौरवच्‍या क्रिकेटमधील दबंगगिरीचे कौतूक बॉलिवुडचा शाहरूख खानदेखील करतो. आयपीलएलच्‍या पहिल्‍या सामन्‍यात कोलकता नाईट राइडर्स संघाचा कर्णधार सौरभ गांगुली होता.
पुढील स्‍लाईडवर वाचा सौरभचे रेकॉर्ड जे आजपर्यंत कोणी तोडू शकले नाही...