आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Cricketer Kapil Dev Latest News In Marathi

कपिल- गावस्‍कर पुन्‍हा उतरणार मैदानात, भारतासाठी जिंकतील \'वर्ल्‍ड कप- 1983\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'चक दे इंडिया', 'लगान', 'भाग मिल्‍खा भाग' इत्‍यादी चित्रपट हिट झाले असतांना 'वर्ल्‍ड कप- 1983' वर आधारित चित्रपट बनविण्‍याचा मानस संजय सिंह पूरन यांचा आहे. या चित्रपटाचे नाव '1983' असू शकते. संजय हा चित्रपट दिग्‍दर्शित करणार आहेत. ते पुढे म्‍हणाले, की 'वर्ल्‍ड कप- 1983' हा चित्रपटासाठी विषय घेऊन मी फार आनंदी आहे. आतापर्यंत यावर कोणी चित्रपट का काढला नाही याविषयीच माझ्या मनात प्रश्‍न आहे.

संजय यांनी सांगितले, की 'या चित्रपटात कपिल देव आणि सुनील गावस्‍कर अतिथी कलाकार म्‍हणून काम करु शकतील. ते काम करणार की नाही याविष्‍ायी आताच चर्चा करणे आततायीपणाचे ठरेल.'

'वर्ल्‍ड कप- 1983' च्‍या अंतीम सामन्‍यातील रोमहर्षक लढत
25 जून 1983 मध्‍ये लॉर्डसच्‍या ऐतिहासिक मैदानावर हा भारत विरध्‍द वेस्‍ट इंडीज हा सामना झाला होता. कुणाच्‍याही ध्‍याणीमणी नव्‍हते, की सलग तीन वेळेस विश्‍वचषक जिंकलेल्‍या वेस्‍ट इंडिजला भारत पराभूत करेल. वेस्‍ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. भारतीय संघ 54.4 षटकात 183 धावा करु शकला(पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा खेळला जायचा) गॅरी सोबर्सने तीन विकेट मिळविल्‍या होत्‍या.

अमरनाथ आणि मदनलालची कमाल
मदनलाल आणि अमरनाथ यांच्‍या गोलंदाजीने वेस्‍ट इंडीज फंलदाजांची हवाच काढून घेतली. 52 षटकातच वेस्‍ट इंडीज संघ गारद झाला होता. महान फलंदाज विवियन रिचर्डस सर्वाधीक 33 धावा काढून बाद झाले होते.

अमरनाथने त्रिफळा उडविताच मैदानात उतरला जनसागर
अमरनाथने वेस्ट इंडीज फलंदाज मायकल होल्डिंगचा त्रिफळा उडविताच स्‍टेडियमध्‍ये उपस्थित असलेले हजारो भारतीय प्रेक्षक मैदानात उतरले होते. त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा होता. कर्णधार कपिलसहित संपूर्ण भारतीय क्रिकेटपटूचे नाव क्रिकेटरसिकांच्‍या हृदयात कोरले गेले. त्‍यानंतर 2011 मध्‍ये कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्‍या नेतृत्‍वाखाली भारतीय संघाने 'वर्ल्‍ड कप' जिंकला.

पुढील स्‍लाइडवर क्लिक करा आणि पाहा, 'वर्ल्‍ड कप- 1983' ची रोमहर्षक छायाचित्रे...