आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Cricketer Sourav Ganguly Latest News In Marathi

रैनाच्‍या प्रदर्शनावर खुश आहे \'दादा\' सौरव गांगुली; \'सिक्‍सर किंग\' युवराजचीही केली पाठराखण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली - रवींद्र जडेजाने युवराजची खिल्‍ली उडविल्‍यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार 'दादा' सौरव गांगुलीने युवराजची पाठराखण केली आहे. त्‍याचबरोबर गांगुली सध्‍या सुरेश रैनाच्‍या प्रदर्शनावर खुश आहे.

गांगुली म्हणतोय, की टी-20 प्रकारात सुरेश रैना उत्‍तम फलंदाज आहे. या सामन्‍यांमधील त्‍याच्‍या यशाने त्‍याला भविष्‍यात संधी मिळणार आहे. आतापर्यंतच्‍या चार सामन्‍यात 41, 54, नाबाद 35 आणि नाबाद 4 धावा काढल्‍या आहेत. रैनाने या खेळीचे श्रेय गांगुलीच्‍या मार्गदर्शनाला दिले आहे.

युवराजने काळजी करू नये
गांगुलीने युवराजविषयी बोलताना म्‍हटले, की 'काळजी करू नये, प्रत्‍येक फलंदाजाची लय जात असते. युवराज आक्रमक फलंदाज असून त्‍याची लय पुन्‍हा परत येईल. युवराज फक्‍त दोन सामन्‍यांमध्‍येच धावा करु शकला नाही.

रैना वर कधीच शंका नव्‍हती
गांगुलीने म्‍हटले, की ''मला रैनाच्‍या प्रतिभेविषयी आणि त्‍याच्‍या योग्‍यतेविषयी कधीच शंका आली नाही. कमी षटकांच्‍या क्रिकेटमध्‍ये रैनाचे नेहमीच चांगले प्रदर्शना राहिले आहे. भारतासमोर जूलै ते सप्‍टेंबर महिन्‍यात इंग्‍लड, ऑस्‍ट्रेलिया यांचे आव्‍हान असणार आहे. मला वाटते की, आताच्‍या विश्‍वचषकापेक्षाही चांगले प्रदर्शन भारताकडून व्‍हायला हवे.

युवराज सिंह आणि रैनाची छायाचित्रे पाहण्‍यासाठी पुढील स्‍लाइडवर क्लिक करा...