वेलिंग्टन - न्यूझीलंडचा फलंदाज लू व्हिसेंटला इंग्लिश क्रिकेट बोर्ड व चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 कौन्सिलने मॅच फिक्सिगच्या आरोपाखाली आजीवन बंदीची शिक्षा केली आहे.
आयसीसीनेही या शिक्षेला आज पाठिंबा देत आपल्या या संदर्भातील ‘झीरो टॉलरन्स’ भूमिकेचा पुनरुच्चार केला. लँकेशायर व डरहॅम कौंटीचा 2008 मधील सामना आणि ससेक्स व लँकेशायर यांच्यात 2011 मध्ये होव येथे झालेला सामना व ससेक्स व केंट यांच्यातील तेथेच झालेला सामना यामध्ये निकाल निश्चितीत सामील झाल्याचे व्हिसेंट याने मान्य केले होते.
लू विसेंटने मॅच फिक्सिंगचा आरोप स्वत: मान्य केला आहे. त्याने म्हटले, ''माझे नाव लू विसेंट असून मी चीटर आहे. मी माझ्या पोजीशनचा वाईट त-हेने उपयोग केला आहे. मॅच फिक्सिंगसाठी मी पैसा घेतला होता.''
(फाईल फोटो)