आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Forthcoming World Cup Jayawardhane, Afridi More Experienced Players

आगामी विश्वचषकात जयवर्धने, आफ्रिदी सर्वात अनुभवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - येत्या १४ फेब्रुवारीपासून सुरू होणारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अनेक विक्रम, उच्चांक आणि मैलाचे दगड निर्माण करणार आहे. सहभागी देशांच्या क्रिकेट बोर्डांनी आपापले संभाव्य संघ जाहीर केल्यानंतर आज आयसीसीने, २०१५च्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वात अधिक अनुभवी खेळाडू श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी हे असतील, असे जाहीर केले आहे.

जयवर्धने व आफ्रिदी या दोघांनीही १९९९मध्ये आपल्या विश्वचषक मोहिमेला सुरुवात केली होती. तेव्हापासून १९९९, २००३, २००७, २०११ व आता २०१५ अशा सलग पाच विश्वचषकांत सहभागी होण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी असेल.
-जयवर्धने २०११ व २००७ च्या फायनलमध्ये खेळला होता. २००३ च्या उपांत्य फेरीतही खेळण्याचा मान त्याला मिळाला होता.
-लॉर्ड्सवर १९९९मध्ये अंतिम फेरीत आफ्रिदी पाकचा सदस्य होता. २०११ च्या विश्वचषकात त्याने पाकचे नेतृत्वही केले
होते.
-८ जानेवारीपर्यंत अंतिम संघांची घोषणा करण्याचे आदेश आयसीसीने दिले. त्यामुळे जयवर्धने व आफ्रिदी हे ५
विश्वचषकांत खेळणा-यांच्या बिरादरीत सामील होतील.
-५ विश्वचषक खेळणा-या खेळाडूंची पंगत अशी आहे... वसीम अक्रम, शिवनारायण चंद्रपॉल, अरविंद डिसिल्वा, इंझमाम
उल हक, सनथ जयसूर्या, जॅक कॅलिस, इम्रान खान, ब्रायन लारा, मुथय्या मुरलीधरन, थॉमस ओडोयो, रिकी पाँटिंग,
अर्जुन रणतुंगा व स्टीव्ह टिकोलो.
- सर्वाधिक सहा विश्वचषक खेळण्याचा पराक्रम फक्त दोनच खेळाडूंच्या नावावर आहे. भारताचा सचिन तेंडुलकर आणि
पाकिस्तानचा जावेद मियाँदाद, हे दोनच खेळाडू ६-६ विश्वचषक स्पर्धांत खेळले आहेत. जावेद मियाँदाद १९७५ ते १९९६
या कालावधीत खेळला होता. सचिन तेंडुलकरने १९९२ ते २०११ या कालावधीत भारताचे प्रतिनिधित्व विश्वचषकात केले
होते.
- जेम्स अँडरसन, ख्रिस गेल, ब्रँडॉन मॅक्युलम, युनूस खान, रॉबिन पीटरसन, कुमार संगकारा, डॅनियल व्हिटोरी.

1996 नंतर प्रथमच विश्वचषकात खेळणा-या यूएई संघातील खुर्रम खान हा ४३ वर्षीय खेळाडू वयाने सर्वात मोठा खेळाडू असेल. त्यांचाच योदीन पुंजा हा खेळाडू १५ वर्षांचा असून २०१५ च्या स्पर्धेतील सर्वात तरुण खेळाडू असेल.