आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रीला ४ ऑडी; एक घेतली विराटने, किंमत ३ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - क्रिकेटपटू विराट कोहलीने ऑडीची लिमिटेड एडिशन स्पोर्ट््स कार आर ८ एलएमएक्स खरेदी केली आहे. कारची एक्स शोरूम किंमत २.९७ कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे कंपनीने या मॉडेलच्या फक्त ९९ कार तयार केल्या असून, भारतात विक्रीसाठी चार गाड्या आल्या आहेत.

आतापर्यंत दोन कारची विक्री झाली असून त्यापैकी एक कोहलीने खरेदी केली आहे. विराटकडे आधीपासूनच ऑडीच्या आर ८ व्ही १० आणि क्यू ७ या दोन लक्झरी कार आहेत. ऑडीने आर ८ एलएमएक्स या वर्षी जानेवारीतच लाँच केली आहे.

अाजवरचे शक्तिशाली मॉडेल
ऑडी इंडियाचे प्रमुख जो किंग यांच्या मते, ही ऑडीची आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली कार आहे.

5200 सीसीचे व्ही १० इंजिन आहे.
0-100 किमीचा वेग फक्त ३.४ सेकंदांत पकडू शकते.
320 किमी प्रति तास टॉप स्पीड
7 स्पीडचा गिअरबॉक्स आहे.

500 मीटरपर्यंत स्पष्ट दिसू शकते लेझर हाय बीम लायटिंगमुळे.

इतर भारतीय क्रिकेटपटूंकडील लक्झरी कार
*सचिन तेंडुलकर : निसान जीटी-आर, बीएमडब्ल्यू, मर्सिडीझ ई ६३ एएमजी, ऑडी, पोर्शे बॉक्सटर,
*रैना : पोर्शे बॉक्सटर (लिमिटेड एडिशन)
*धोनी : फेरारी ५९९ जीटीओ, हमर
*हरभजन सिंग : हमर
*युवी: लॅम्बोर्गिनी, बीएमडब्ल्यू एम ३, एम ५, ऑडी क्यू ५,पोर्शे. सेहवाग : बेंटले, बीएमडब्ल्यू.