आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Days Match: Second Day India A Team Three Out, 124 Runs

चारदिवसीय सामना: दुस-या दिवशी भारत अ संघाचे तीन बाद, 124 धावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

म्हैसूर - सलामीवीर लोकेश राहुल (46) आणि मनप्रीत जुनेजाच्या (नाबाद 47) शानदार कामगिरीच्या बळावर भारत अ संघाने गुरुवारी वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध पहिल्या चारदिवसीय सामन्यात दुस-या दिवशी तीन बाद 124 धावा काढल्या. भारतीय संघ अद्याप 305 धावांनी पिछाडीवर असून संघाकडे सात विकेट शिल्लक आहेत. दुस-या दिवसाचा खेळ संपला तेव्हा जुनेजा 47 आणि हर्षद खाडीवाले 5 धावांवर खेळत आहेत. पाच बाद 264 धावांवरून पुढे खेळणा-या वेस्ट इंडीज संघाने पहिल्या डावात 429 धावांचा डोंगर उभा केला. भारताकडून आॅफस्पिनर परवेझ रसूलने 5 विकेट घेतल्या.
भारताकडून राहुल आणि जीवनज्योतसिंगने (16) पहिल्या विकेटसाठी 45 धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर अवघ्या चार धावांच्या अंतराने भारताचे दोन गडी बाद झाले. वीरासामीने जीवनज्योतला आणि मिगुएल सिमन्सने कर्णधार चेतेश्वर पुजाराला बाद केले. राहुल आणि जुनेजाने तिस-या गड्यासाठी 60 धावांची भागीदारी केली. राहुलने 100 चेंडूंत सात चौकारांसह 46 धावा काढल्या. दुस-या दिवसांचा खेळ संपण्यापूर्वी तो बाद झाला. जुनेजा 77 चेंडूंत सात चौकारांच्या साह्याने 47 धावा काढून नाबाद आहे.


तत्पूर्वी विंडीजने पाच बाद 264 धावांवरून गुरुवारी खेळण्यास सुरुवात केली. असद फुदादिन 4 आणि चेडविक वॉल्टन 26 धावांवर खेळत होते. दरम्यान, ईश्वर पांडेने वॉल्टनला (35) पायचीत केले. फुदादिनने 201 चेंडूंत दहा चौकार आणि एका षटकारासह नाबाद 86 धावा काढल्या. निकिता मिलरने 86 चेंडूंत पाच चौकार ठोकून 49 धावांची खेळी केली. या दोघांनी सातव्या गड्यासाठी 88 धावांची भागीदारी केली.


गोलंदाजीत भारताकडून जम्मू-काश्मीरचा फिरकीपटू परवेझ रसूलने 116 धावा देऊन पाच विकेट घेतल्या. ईश्वर पांडेने 27 षटकांत 69 धावा देऊन दोन गडी बाद केले. मोहंमद शमी, रजत पालीवालने प्रत्येकी एक विकेट घेतली.


रसूलचा खेळ
ऑफस्पिनर परवेझ रसूलने मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ उचलताना स्वत:ला सिद्ध केले. रसूलने पाच विकेट घेतल्या. दुस-या दिवशी गोलंदाजीदरम्यान त्याने टॉपस्पिन, आॅफस्पिन अशा चेंडूंनी फलंदाजांना त्रस्त केले. या शानदार कामगिरीनंतर त्याने टीम इंडियासाठी पुन्हा दावेदारी सिद्ध केली आहे.
05
विकेट
45
षटके
13
निर्धाव षटके
116
धावा


धावफलक
वेस्ट इंडीज पहिला डाव (कालच्या 5 बाद 264 धावांवरून पुढे)
धावा चेंडू 4 6
फुदादिन नाबाद 86 201 10 1
वाल्टन पायचीत गो. ईश्वर पांडे 35 41 4 2
मिलर धावबाद 49 86 5 0
पेरामल झे. पुजारा गो. रसूल 11 21 2 0
जॉनसन झे.शमी गो. रसूल 0 4 0 0
कमिन्स पायचीत गो. रसूल 6 15 1 0
अवांतर : 21. एकूण : 135 षटकांत सर्वबाद 429. गोलंदाजी : शमी, 21-2-75-1, पांडे 27-7-69-2, डिंडा 25-2-80-0, रसूल 45-13-116-5, पालीवाल 13-3-56-1, हर्षद 4-0-17-0.
भारत अ संघ (पहिला डाव) धावा चेंडू 4 6
राहुल झे. जॉन्सन गो. मिलर 46 100 7 0
जीवन झे. वॉल्टन गो. पेरामल 16 39 1 0
पुजारा झे. पॉवेल गो. कमिन्स 3 9 0 0
मनप्रीत जुनेजा नाबाद 47 77 7 0
हर्षद खडीवाले नाबाद 5 36 0 0
अवांतर : 7. एकूण : 43 षटकांत 3 बाद 124. गोलंदाजी : एम.कमिन्स 12-1-37-1, डी.जॉन्सन 9-3-28-0, वीरासामी पेरामल 13-2-45-1, एन.मिलर 9-4-10-1.