आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Days Match Series: Gambhir, Pujara Made Century

चार दिवसीय सामन्यांची मालिका: गंभीर, पुजाराचे शतक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हुबळी - आगामी मालिकेसाठी टीम इंडियात पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या गौतम गंभीरने गुरुवारी धडाकेबाज शतकी खेळी केली. त्याने मालिकेत वेस्ट इंडीज अ संघाविरुद्ध तिस-या चारदिवसीय सामन्याच्या दुस-या दिवशी 123 धावा काढल्या. यासह त्याने भारत अ संघाला 66 धावांची आघाडी मिळवून दिली.


दरम्यान, कर्णधार चेतेश्वर पुजारानेही नाबाद 139 धावांचे योगदान दिले. त्याने सलामीवीर गौतम गंभीरसोबत दुस-या विकेटसाठी 207 धावांची भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर यजमान भारतीय संघाने गुरुवारी पहिल्या डावात दुस-या दिवसअखेर 3 गड्यांच्या मोबदल्यात 334 धावा काढल्या. चेतेश्वर पुजारा व अभिषेक नायर (नाबाद 10) मैदानावर खेळत आहे.