आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Four Golden And One Bronge Shild Get Sumedhkumar

सुमेधकुमारला चार सुवर्ण, एक कांस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या गन फॉर ग्लोरी शूटिंग चॅम्पियनशिप स्पध्रेत औरंगाबादचा आघाडीचा नेमबाज सुमेधकुमार देवने 4 सुवर्ण व 1 कांस्यपदक पटकावले. त्याने ज्युनियर खुल्या वैयक्तिक गट, ज्युनियर संघ, ज्युनियर सिव्हिलियन वैयक्तिक आणि ज्युनिअर सिव्हिलियन सांघिक गटात सुवर्ण कामगिरी साधली. वरिष्ठ सिव्हिलियन सांघिक गटात कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

सुमेध चित्तेपिंपळगाव येथील तुळजाभवानी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. तो पुढील महिन्यात इराण येथे होणार्‍या 6 व्या आशियाई ज्युनियर शूटिंग चॅम्पियनशिपसाठी स्पध्रेत सहभागी होणार आहे. त्याच्या यशाबद्दल ऑलिम्पिकपटू गगन नारंग, प्रशिक्षक पवनसिंग, पोलिस आयुक्त संजयकुमार, उपायुक्त सोमनाथ घार्गे, डॉ. जय जाधव, अरविंद चावरिया, संस्था सचिव विजय जाधव यांनी अभिनंदन केले.