आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथ्या राष्ट्रीय पायका स्पर्धा : महाराष्ट्र संघाला धनुर्विद्येत सुवर्ण !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - पायका युवा क्रीडा व खेळ अभियानांर्तगत साई येथे आयोजित चौथ्या राष्ट्रीय ग्रामीण स्पर्धेत धनुर्विद्या स्पर्धेत महाराष्ट्र मुलांच्या संघाने 1744 गुणांसह विजेतेपद पटकावले. गुजरात (1708) दुस-या, तर नागालँड (1676) संघ तिस-या स्थानी राहिला. मुलींच्या गटात नागालँड संघाने (1553) प्रथम क्रमांक पटकावला. आसाम (1551) दुस-या, तर झारखंडने (1505) तिसरे स्थान मिळवले. महाराष्ट्राचा संघ 1027 गुणांसह सहाव्या स्थानी फेकला गेला.
मुलांच्या गटात संघाच्या विजयामध्ये राज्यातील अहमदनगरच्या विशाल इंगळेने 580 गुण, साता-याच्या सूरज अनपटने 576 गुण, रत्नगिरीच्या शुभम चव्हाणने 557 गुण, तर अमोल फडकेने 588 गुण घेतले. चौथ्या स्थानावर आसाम 1673 गुण, ओरिसा 1671 गुण, झारखंड 1664 गुण, छत्तीसगड 1569 गुण, उत्तर प्रदेश 1532 गुण, आंध्र प्रदेश 1325 गुण, दिल्ली 1261 गुण, सिक्कीम 998 गुण, तामिळनाडू 877 गुण, मध्य प्रदेश 510 गुण.
मुलींच्या गटात चौथ्या स्थानावर नवी दिल्ली 1458 गुण, गुजरात 1236 गुण, छत्तीसगड 1201 गुण, महाराष्ट्र 1027 गुण, सिक्कीम 948 गुण, उत्तर प्रदेश 927 गुण, मध्य प्रदेश 503 गुण, तामिळनाडू 214 गुण.

हॉकी : ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश संघाची आघाडी
हॉकीमध्ये मुलांच्या गटात ओरिसा संघाने छत्तीसगडला 5-0ने पराभूत केले. यातमध्ये तैपकने 3, प्रशांतने 2 गोल नोंदवले. दुस-या सामन्यात झारखंडने हरियाणाला 2-0ने हरवले. यामध्ये कुमुद आणि जोवाकीमने प्रत्येकी 1 गोल नोंदवला. तिस-या सामन्यात उत्तर प्रदेशने मिझोरमला 5-0 ने नमविले. विजयी संघातर्फे मिथिलेश व मनीषने 2 तर राहुलने 1 गोल नोंदवला. तसेच तामिळनाडूने मध्य प्रदेशवर 1-0ने विजय मिळवला. यामध्ये एकमात्र विजयी गोल दिनेश राजेने नोंदवला. छत्तीसगडने जम्मू काश्मीर संघावर 4-0 ने मात केली. यामध्ये जॉयदीपने 3 तर गोविंदाने 1 गोल नोंदवला.
इतर निकाल :
ओरिसा वि.वि. केरळ 7-0, झारखंड वि.वि नवी दिल्ली 3-0, तामिळनाडू वि.वि. त्रिपुरा 2-0, पंजाब वि.वि. मिझोरम 2-0, छत्तीसगड वि.वि. केरळ 1-0, हरियाणा वि.वि. आंध्र प्रदेश 6-2, मध्य प्रदेश- कर्नाटक लढत बरोबरीत, उत्तर प्रदेश वि.वि. गुजरात. केरळ वि.वि. आंध्र प्रदेश.