आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेथे गवत कापायचा, तेथे आता गोलंदाजी करणार !

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अ‍ॅडिलेड - भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान येत्या 24 जानेवारीपासून अ‍ॅडिलेड येथे चौथ्या कसोटीला प्रारंभ होत आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाकडून असा खेळाडू खेळणार आहे, जो कधीकाळी या खेळपट्टीवरचे गवत कापण्याचे काम करीत होता. होय...नॅथन लॉयन हे त्या क्रिकेटपटूचे नाव आहे.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडदरम्यानच्या मागच्या उन्हाळ्यात (अ‍ॅडिलेड कसोटी) अ‍ॅशेज मालिकेदरम्यान लॉयन अ‍ॅडिलेड क्युरेटर डॅमियन हाऊ यांचा मदतनीस होता. त्या वेळी मैदानाची देखरेख ठेवण्याचे काम त्याच्याकडे होते. ‘सिडने मॉर्निंग हेराल्ड’शी बोलताना लॉयन म्हणाला, ‘मागच्या अ‍ॅशेस मालिकेत मी येथे काम करीत होतो. सकाळी पाच वाजता लवकर उठून मी गवत कापण्यासाठी मैदानावर जायचो. तो अनुभव खास आहे. क्रिकेट खेळण्यासाठी अ‍ॅडिलेड हे खूप चांगले स्थान आहे. मी कधीकाळी येथे गवत कापत होतो, याबाबत मी आता चिंतेत नाही. आता माझे पूर्ण लक्ष केवळ कसोटीवर आहे. माझ्याकडे नऊ कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. माझा स्वत:वर विश्वास आहे. मी संघातील प्रत्येक खेळाडूप्रमाणे सामन्याची तयारी करीन,’ असेही या वेळी त्याने नमूद केले.
क्युरेटर हाऊ यांनीसुद्धा या वेळी नॅथन लॉयनची स्तुती केली. हाऊ म्हणाले, ‘आम्हाला दुसºया मैदानांच्या देखरेखीचेसुद्धा काम होते. मात्र, लॉयनला याच मैदानावर जास्त वेळ घालण्यास आवडत असे. त्याला मागच्या अ‍ॅडिलेड कसोटीचा अनुभव घ्यायचा होता. तो कॅनबराहून येथे आला होता. त्याच्याकडे क्रिकेटची चांगली ओळख होती. तो क्रिकेटपटू आहे, हे मला माहिती होते. मात्र, कधीकाही तो ऑस्ट्रेलियाकडून खेळेल, हे त्या वेळी मी स्वप्नातसुद्धा विचार केला नव्हता,’ अशी स्पष्ट कबुली या वेळी त्याने दिली.
सचिनला गोलंदाजी करण्याचे स्वप्न
या मालिकेत आतापर्यंत 180 धावांत केवळ 2 विकेट घेणाºया नॅथन लॉयनला सचिन तेंडुलकरची विकेट घ्यायची आहे. या मालिकेत अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नसली तरीही ऑस्ट्रेलिया संघातील स्थान कायम ठेवण्यावर त्याने जोर दिला आहे. ‘चौथ्या कसोटीत मला सचिन तेंडुलकरला गोलंदाजी करायची आहे. सचिनला गोलंदाजी करणे, हे माझे स्वप्न राहिले आहे. सचिनला रोखण्याचा मी प्रयत्न करीन. मला अ‍ॅडिलेड येथे मोठ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करायची इच्छा आहे,’ अशी प्रतिक्रिया या वेळी लॉयनने व्यक्त केली. मी वॉर्नसोबत बोललो आहे. त्याने फिरकी गोलंदाजी कशी करायची ? याबाबत काही टिप्स दिल्या आहेत. त्या मला कामी येतील, असा विश्वासही या वेळी त्याने व्यक्त केला.